शिक्षण मंत्र्याच्या हस्ते श्रीमती तेजस वारूळे-शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकताच महाराष्ट्र राज्य नगरपालिका-महानगरपालिका शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ,आदर्श शाळा व प्रेरणा पुरस्कार सोहळा लोणावळा येथे पार पडला.
यावेळी कोपरगाव नगरपालिका शाळा नं.९ च्या उपक्रमशील शिक्षिका मा.श्रीमती तेजस वारूळे -शिंदे यांना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांचे शुभहस्ते आदर्श शिक्षिका पूरस्कार प्रदान करण्यात आला.
मा.वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक कामाचे व कोरोना काळातील ऑनलाईन-ऑफलाईन मार्गदर्शनाचे विशेष कौतूक केले.अशैक्षणिक कामे कमी करणे,शंभर टक्के वेतन शासनाकडून मिळणे व बदली पोर्टल सुरू करणेबाबत आश्वासीत केले.नगरपालिका-महानगरपालिका शिक्षक कामात पुढे पण सुविधांपासून वंचीत असलेबाबत खंत व्यक्त केली.आमदार मा.संजय जगताप यांनी नगरपालिका शिक्षकांच्या अनेक समस्या मांडून त्या सोडविणेबाबत शासनास विनंती केली.
पूरस्कार प्रदान कार्यक्रमास पूरंदरचे आमदार मा.संजय जगताप ,राज्य शिक्षण संचालक मा.श्री दत्तात्रय जगताप ,मा.श्री औदूंबर उकिरडे-शिक्षण उपसंचालक ,मा.श्री सुनिल अण्णा शेळके व मा.श्री अर्जून कोळी सर उपस्थित होते.
श्रीमती तेजस वारूळे यांनी विद्यार्थीभिमूख मनोरंजक उपक्रम राबवले.टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती,शैक्षणिक ब्लाॅग ,शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती ,तंत्रज्ञानाचा योग्य वापर यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले.तसेच कोरोनाकाळात ऑनलाईन -ऑफलाईन अभ्यास घेऊन शिक्षण घरोघर पोहचविले.विविध स्पर्धा व नवोपक्रम राबविले.
श्रीमती तेजस वारूळे यांना प्रशासनाधिकारी मा.श्री मोहनीश तुंबारे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांचे पती श्री प्रशांत शिंदे हेही पुरस्कार प्रदानास उपस्थित होते .त्यांचे श्री सुनिल रहाणे ,श्री विलास माळी ,श्री अरूण पगारे व नगरपालिका शिक्षकांनी अभिनंदन केले .
प्रास्ताविक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री अर्जून कोळी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *