

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातील मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना अधिस्वीकृती पत्रिकांचे वितरण करण्यात आले. वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात हा समारंभ झाला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील दैनिक वार्ताच्या संपादक श्रीमती क्रांती सुहास हुद्दार व दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक श्रीमती बबिता राजेंद्र पोवार यांना महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती पत्रिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, माहिती प्रसारण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह शासकीय अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
