“पिंडदाना बरोबरच केले शैक्षणिक वस्तूंचे दान प्रेरणादायी”:- मनोहर त्रिभुवन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मयत व्यक्तीच्या दशक्रिया विधी निमित्ताने पिंड दान केले जाते मात्र पिंड दाना बरोबरच शैक्षणिक साहित्याचे केलेले दान प्रेरणादायी आहे असे मत सेवा निवृत्त मत्स्य उपयुक्त मनोहर त्रिभुवन यांनी व्यक्त केले
लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांच्या आजी हौसाबाई पोळ यांचे नुकतेच वयाच्या १०१ वर्षी निधन झाले मात्र नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी असलेल्या व महापुरुषांच्या विचारांची पकड असलेल्या पोळ यांनी आजीच्या अंत्यविधी नंतर रक्षा गंगेत विसर्जित करण्या ऐवजी पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वृक्ष संवर्धन केले व ही रक्षा झाडांना टाकली त्याच प्रमाणे दशक्रिया विधी निमित्ताने पिंड दान करण्या बरोबरच ज्या शाळेत शिक्षण घेत असताना त्यांच्या आजीने उधार उसनवारी करून वही पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य घेऊन दिले त्या मुळे त्यांचे शिक्षण होऊ शकले ह्या गोष्टींची आठवण म्हणून पहिली ते चौथी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना वही पेन दिले व एक आदर्श निर्माण केला
त्यांचे मोठे भाऊ अरुण पोळ (रयत सेवक) व अँड.दिपक पोळ यांनी देखील ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यास सहकार्य केले
तसेच या वेळी मागील वर्षांपासून कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, पत्रकार,पोलीस अधिकारी यांना कोविड सन्मान योद्धा प्रशिस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले
पिंडदाना बरोबर शैक्षणिक साहित्याचे दान करून उल्लेखनीय काम केल्या बद्दल या उपक्रमाचे सेवा निवृत्त मत्स्य उपयुक्त मनोहर त्रिभुवन यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *