शुरवीर जिवा महाले यांची जयंती आपण आपल्या गावात, ग्रामपंचायत कार्यालय किंवा आपल्या गावचे प्रशासकीय कार्यालय अशा ठिकाणी साजरी करावी:- श्री.किरणभाऊ बिडवे, श्री. मनोजभाऊ वाघ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
समाजातील सर्व समाज बांधवांना व पदाधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे की, येत्या शनिवारी ९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक व नाभिक समाजाचे दैवत शिवरत्न जिवा महाले यांच्या ३८६ वी जयंती आहे. तरी आपण सर्वांनी शुरवीर जिवा महाले जयंती आपल्या गावात, ग्रामपंचायत कार्यालय किंवा आपल्या गावचे प्रशासकीय कार्यालय असते अशा ठिकाणी साजरी करावी. अथवा आपल्या सलुन दुकान पुढे जागा असल्यास नरवीर जिवा महाले यांची प्रतिमेला ठेवून हार घालून मानवंदना द्यावी. यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला एक आदर्श निर्माण होईल. व जनसामान्यांमध्ये जनजागृती होईल. नरवीर जिवा महाले कोण होते हे लोकांना बहुतांशी लोकांना माहीत नाही कारण काही लोक ‘जिवा महाले’ ऐवजी ‘जिवा महार’ असा उल्लेख करतात तरी सर्वांनी आपल्या आपल्या प्रयत्नाने गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, जिल्हा परिषद सदस्य जो कोणी शासनाचा पदाधिकारी आहे त्याच्या हस्ते साजरा करण्याचा प्रयत्न करावा व शिवरत्न जिवा महाले जयंती साजरी करावी ही नम्र विनंती …

आपलेच समाज बांधव …
मा.श्री किरणभाऊ बिडवे, कोपरगाव
(प्रदेश कार्याध्यक्ष, नाभिक एकता महासंघ)
मा.श्री मनोजभाऊ वाघ, शिर्डी
(जिल्हाध्यक्ष, नाभिक एकता महासंघ)
मा.श्री किरणभाऊ बिडवे, आश्वी
(जिल्हाध्यक्ष, सलुन असोसिएशन)
मा.श्री किरणभाऊ मदने, संगमनेर
(प्रवक्ते, नाभिक एकता महासंघ)

व्दारे: महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघ संलग्न सलुन असोसिएशन अहमदनगर जिल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *