
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4215561761903804&id=100003500663864
कोपरगाव प्रतिनिधी:-
जुनीगंगा देवी,कोपरगाव…
गोदावरी तीरावरील कोपरगाव हे प्राचीन, पौराणिक आणि साधू-संतांच्या पद्स्पर्शाने पावन झालेली अध्यात्मिक भुमी आहे…अहमदनगर-मनमाड महामार्गवर कोपरगाव शहरालगत जेऊर कुंभारी हद्दीत पुणतांबा चौफुली जवळ “जुनी गंगा देवी”चे मंदिर आहे…
पौराणिक कालखंडात देव-दानवांमध्ये कायम युध्द होत असे…अशाच एका युध्दाप्रसंगी देवीने रुप घेवून युध्दात समेट घडविण्यासाठी प्रकट झाली. त्या वेळेस गुरु शुक्राचार्य हे दानवांचे गुरू होते.त्यांना कळले कि,देवी आपल्याकडे येत आहे म्हणून ते देवीच्या स्वागतासाठी गावाबाहेर आले.देवी व गुरू शुक्राचार्य भेटीचे स्थान म्हणजे ‘जुनीगंगा देवी’ होय…देवीचे खरे नाव दुर्गामाता देवी आहे…श्री. नाईकवाडे परिवाराकडे देवस्थानची जबाबदारी पुर्वपरंपरागत आहे…देवी मंदिरासमोर १४ फुट दिपमाळ आहे…
जुनी गंगा देवी मंदिर हे गोदावरी नदीचे पात्राचा जुना मार्गात आहे… जेव्हा-जेव्हा गोदावरी दुथडी भरून वाहते आणि पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होते…तेव्हा-तेव्हा नदीपात्रातून पाणी फूटून जुनी गंगा दिशेला वळते…शेकडो वर्षांपासून देवीचे मंदिर अनेकदा पुराच्या पाण्यात येवूनही पूर ओसरल्यावर मुर्ती पुर्ववर राहते हे विशेष आहे… गोदावरी नदीचे पाणी जुनी गंगा दिशेने फुटल्याने कोपरगाव शहरात पाणी पातळी कमी राहून जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात टळते…देवी आपल्याला संकटात तारते ही मोठी भावना कोपरगावकरात आजही आहे… त्यामुळे कोपरगाव शहरातील बहुतांश नागरिक शहराबाहेर प्रवासाचे निमित्ताने निघालेवर देवीला आवर्जून नमस्कार करत पुढे मार्गस्थ होतात…
घटस्थापना पासून नवरात्र उत्सवाची सुरुवात येथे होते…विविध खाद्य-पेय,खेळणी स्टाँल मुळे येथे यात्रेचे स्वरूप असते…कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी जुनी गंगा देवस्थानने या वर्षीचा नवरात्र उत्सव आणि यात्रा या वर्षांकरिता स्थगित केली आहे…
देवीची उपासना करतांना आपण नेहमी म्हणतो…
‘या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥’
म्हणजे…जीवसृष्टीच्या सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपात वसलेल्या देवीला नमस्कार, नमस्कार, वारंवार नमस्कार.
हा नमस्कार जीवसृष्टीत सामावलेल्या सजीवातील देवी रुपाला आहे…जो सुंदर सृष्टी अनुभवतो आहे…प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करत भक्ती भावाने नवरात्र उत्सव साजरा करुया…
देव-दानवांची नगरी म्हणून पौराणिक ओळख असलेल्या…कोपरगांव नगरीतील समस्त कोपरगांवकरांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा
– सुशांत घोडके,स्वच्छतादूत
(गोदातीर परिसर माहिती संग्राहक)
