कोपरगाव खरीप पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी-सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
गुलाब चकीवादळाच्या प्रभावाने झालेली अतिवृष्टी आणि हस्त नक्षत्राच्या पावसाने उडविलेली दाणादाण यामुळे कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील शेतक-यांच्या खरीप पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे त्याची पिके पाण्यात सडली आहेत तेव्हा सरसकट पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. शेतकरी अडचर्णीत सापडला आहे त्याला शासनाने मदतीचा हात द्यावा.
गुरूवारी सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसिलदार विजय बोरुडे यांची भेट घेवून प्रलंबित समस्या संदर्भात चर्चा केली. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, पालिका गटनेते रविंद्र पाठक, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे संचालक साहेबराव कदम, दिपक चौधरी, विनोद राक्षे, निलेश बो-हाडे, आदि उपस्थित होते.
सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, दसरा दिवाळी सण तोंडावर आले आहेत, कोरोना आपत्तीत केंद्र व राज्य शासनाने विनामोबदला स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत करावे जेणेकरून त्याचा फायदा शिधापत्रिकाधारकांना होईल. ज्या ज्या शिधापत्रिकाधारकांचे विभक्तीकरण झालेले आहे. त्यांचा अन्न सुरक्षा यादीत समावेश करावा त्याचप्रमाणे गोदावरी नदीला पुर आल्यानंतर शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन या शेतकरी बांधवांना अद्यापही शासकीय भरपाई मिळालेली नाही ती तात्काळ देण्यात यावी.
सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोपरगांव विधानसभा मतदार संघात गेल्या दोन आठवडयापासुन मुसळधार पाउस होत आहे. खरीपाचे पीक काढणीला आले आहे मात्र निसर्गाने त्यावर वरवंटा फिरविला आहे. अद्यापही शेतात पाणी साठलेले आहे. सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, कांद्याची रोपे आदि खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बहुतांष शेतक-यांना अद्यापही मोबाईल अॅपचे ज्ञान नाही, तेंव्हा तहसिल यंत्रणेमार्फत कामगार तलाठी मंडल अधिका-याकरवी थेट शेतक-यांच्या बांधावर जाउन त्याच्या नुकसानीची पाहणी करून त्यास भरपाई द्यावी, यात मिळालेला आधार त्याला रब्बीची पिके घेतांना उपयोगी पडणार आहे. पीक विमा कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी शेतक-यांच्या नुकसानीला दाद देत नाही. त्याचप्रमाणे मनमाड दौंड मार्गावर भूयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत कोपरगाव मतदार संघाच्या हददीतील भूयारी मार्गात अजुनही पाणी साठलेले आहे त्यामुळे दळणवळण ठप्प झाले आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करून या परिसरातील जनतेला दिलासा देण्यांसाठी तहसिल यंत्रणेने पुढाकार घ्यावा. अतिवृष्टीमुळे चिकनगुनिया, मलेरिया, अतिसार, डेंगु, कोरोना आदि सार्थीच्या आजारात वाढ झाली आहे त्यावर प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात असे त्या शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *