आजारी पत्रकारास मराठी पत्रकार परिषदेचा मदतीचा हात”…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य व ‘ दैनिक पुण्यनगरी ‘ चे पत्रकार धनराज साळुंखे ( रा . लोणी काळभोर , ता . हवेली , जि . पुणे ) यांच्या गळ्यात तीन गाठी आल्या होत्या . त्यामुळे त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालय , डेक्कन जिमखाना , पुणे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्या गाठी काढून टाकल्या . शस्त्रक्रिया व त्यानंतरचे औषधोपचारासाठी बराच मोठा खर्च येणार आहे . त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे . ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद , हवेली तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल , लोणी काळभोर या शाळेतील सन १ ९९९ ची दहावीची बॅच यांनी ७६००० हजार रुपयांचा धनादेश आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा . एस एम देशमुख सर , लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते धनराज साळुंखे यांची पत्नी व मुलाला देण्यात आला .

फोटो ओळ:- पत्रकार धनराज साळुंखे यांच्या परिवारास मदतीचा आर्थिक धनादेश देतांना मुख्य विश्वस्त एस . एम . देशमुख , लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , कार्याध्यक्ष शरद पाबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *