कोपरगांव प्रतिनिधी:-
काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय-भारतीय उद्योग परिसंघ) मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यु इनोव्हेशन टेक्नाॅलाॅजी (नविन नाविण्यपुर्ण तंत्रज्ञान) स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या पाच विध्यार्थ्यांनी स्मार्ट गाॅगल फाॅर ब्लाईंड पिपल (अंधांसाठी स्मार्ट चष्मा ) हा प्रकल्प सादर करून सहा देशातील ६० शाळांमधिल स्पर्धाकांमधुन आपल्या नाविण्यपुर्ण प्रकल्पाने बाजी मारून आंतरराष्ट्रीय प्लॅटिनम सीआयआय मिल्का पुरस्कार मिळविला. तसेच संस्था वर्गवारीमध्ये संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी कोडींग, हायब्रीड लर्निंग, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम या विषयी माहिती देवुन संस्थेचे प्रतिनिधित्व केले, या उत्कृष्ट व प्रभावी सादरीकरणास संजीवनी अकॅडमीला गोल्ड अवार्डने सन्मानित करण्यात आले, अशी माहिती स्कूल्सच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या शैला झुंजारराव व संगणक विभाग प्रमुख आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पलाश भरत पटेल, अभिषेक अजय शहा, परीमल दत्तात्रय आदिक, आरती अनिल कारवा व शांभवी अनिल देशपांडे या विध्यार्थ्यांनी प्रोजेक्टमध्ये सीप्लसप्लस (C++) या प्रोग्रामींग भाषेचा उपयोग करून प्रोग्रामिंग व माॅडेल तयार केले. ही भाषा सर्वसाधारण इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांना शिकविल्या जाते. मात्र संजीवनी अकॅडमीमध्ये भव्य संगणकिय कक्ष व संगणकिय तज्ञ असल्यामुळे ही भाषा त्यांना शाळेतच शिकविण्यात आली. कोडींगचा वापर करून विध्यार्थ्यांनी महिनाभर प्रोजेक्टवर काम केले. नवीन शेक्षणिक धोरणानुसार कोडींग हा विषय सुध्दा शाळेतच शिकविला जातो तसेच बदलत्या तंत्रज्ञानाला अवगत करताना आर्टिफिशिअल इंटिलिजन्सलाही (कृत्रिम बुध्दीमत्ता) विशेष महत्व दिल्या जाते.
विध्यार्थ्यांनी दाखविलेले बुध्दीचातुर्य व कौशल्यांबध्दल आणि त्यांच्या पालकांच्या सहकार्याबध्दल, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्काराबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व डाॅ. मनाली कोल्हे यांनी गुणवंत विध्यार्थी व त्यांच्या पालकांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डाॅ. कोल्हे म्हणाल्या की जपान, मलेशिया, युएई, युएसए, सिंगापुर व भारत देशातील ६० शाळा , विशेष करून जीआयआयएस,टोकियो, जपान, जीएसएफ, सिंगापुर, एबीव्ही इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी अँड मॅनेजमेंट, ग्वालिअर, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब, चंदीगड युनिव्हर्सिटी या संस्थांमधिल विध्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लॅटिनम सीआयआय मिल्का व गोल्ड पुरस्कार संजीवनी अकॅडमीनेच मिळविला, या पुरस्काराने संजीवनी अकॅडमीने आंतराराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले आहे.
सदरच्या आंतरराष्ट्रीय उपलब्धी बाबत माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व विध्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

फोटो ओळी:-
सजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय प्लॅटिनम सीआयआय मिल्का पुरस्कार मिळविल्याबध्दल छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.
