कोपरगावचे माजी आमदार के.बी.रोहमारे यांचा ७ डिसेंबर रोजी स्मृतिदिन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व कोपरगावचे माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या चोविसाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द मराठी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व चित्रपट पटकथाकार मा.डॉ. सदानंद देशमुख यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. पदमकांतजी कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी मागील बत्तीस वर्षापासून देण्यात येणाऱ्या भि. ग. रोहमारे पुरस्काराचे वितरणही प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या वर्षी संतोष जगताप (सांगोला, जि. सोलापूर), माधव जाधव (नांदेड), जयराम खेडेकर (जालना), केदार काळवणे (कळंब, जि. उस्मानाबाद), अनंता सूर (वणी, जि. यवतमाळ) इ.मान्यवर लेखकांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. प्रत्येकी रु.११,०००/-, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड्. संजीव कुलकर्णी व के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव व यांनी येथे दिली.

दि. ७ डिसेंबर रोजी कै. के. बी. रोहमारे यांच्या पोहेगाव येथील स्मारकास सकाळी ८.०० वाजता पुष्पचक्र अर्पण करून या कार्यक्रमास आरंभ होईल. सकाळी १० या. भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये करण्यात येईल. तरी या सुवर्णसंधीचा परिसरातील साहित्यरसिकांनी व नागरिकांनी लाभ घेऊन उपस्थित रहावे आणि श्रवणीय अशा या शब्द सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *