कोपरगावात गांधी जयंती निमित्त भाजपाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने शहर व तालुका भाजपच्या वतीने शहराचे आरोग्य अबाधित राखणारा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करून गांधी जयंती साजरी करण्यात आली.
भाजपचे नेते पराग संधान यावेळी बोलताना म्हणाले की जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या शहर व मतदार संघाच्या प्रत्येक आपत्तीत धावून येऊन सर्वप्रथम मदत केली आहे. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश देऊन भारताचे नाव जगात उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.


या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विजय वाजे, विनोद राक्षे, रवी रोमारे, दीपक जपे, सोमनाथ अहिरे, खंडू वाघ, निलेश बो-हाडे, जगदिश मोरे, सागर जाधव, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पहिलवान, मुक्तार पठाण, अशोक लकारे, सोमनाथ मस्के, चंद्रकांत वाघमारे, विनोद नाईकवाडे, शंकर बिऱ्हiडे, वासू शिंदे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. त्यात संजय कसाब, विनोद डाके, प्रमोद फाजगे, संतोष डाके, संजय रिळ, रवी तूजारे, योगिता भोसले, शीला चावरे, छाया गोयल, राजश्री घाटे, दया गुडेकर, महळसा लोंढे अमोल दिनकर, ममता रीळ, उमा कडोसे, राजू लोंढे, योगेश साळवे, रणधीर तांबे, अरुण फाजगे, पवन हाडा, रवींद्र दिनकर, विजय डाके, रमेश घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.
चौकट
भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीनुसार कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे पराग संधान यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *