अंबिकानगर(साई धाम)मंदिर प्रभाग.क्र.4 मध्ये श्री. विजयराव वाजे, सुवर्णाताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पहिला व दुसरा डोस लसीकरण करण्यात आले; समवेत डॉ.आहेर मँडम यांचे सहकार्य लाभले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- अंबिकानगर(साई धाम)मंदिर प्रभाग.क्र.4 मध्ये श्री विजयराव वाजे, सुवर्णाताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पहिला व दुसरा डोस लसीकरण करण्यात आली लसीकरणासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली 440 लसीकरण करण्यात आले.

यावेळी विजयराव वाजे म्हणाले की, कोविड कोविशील्ड कॉव्हँक्सीन हे डोस प्रत्येकाने घेतले पाहिजे यामुळे हि फार मोठी जनतेची सुरक्षा आहे तेव्हा प्रत्येक वॉर्डामध्ये आज पण चालु आहे येथून पुढेही चालुच राहणार आहे या आपल्या जनतेच्या सुरक्षतेसाठी आपण सर्वांनी तन मन धनाने हे डोस आपण घ्यावे अशी सर्व जनतेला आग्रहाची कळकळीची विनंती करतो व तसेच डॉ.आहेर मँडम यांनी सुध्दा जनतेस चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा उपक्रम राबविण्याचा मानसच सुरू केला आहे त्या म्हणाल्या की, प्रत्येक महिला पूरुषाने अतिशय चांगल्या पद्धतीने लस घ्यावी जनता सुध्दा लस घेण्याच्या आव्हानास दाद देत आहे खर्या अर्थाने जनतेचे मी आभार मानते या पुढे सुध्दा जनतेने असेच सहकार्य करावे हिच विनंती.

याप्रसंगी शिव ग्रुप व साईराज ग्रुप व जगदीश मोरे,रवी शेठ वाजे,निलेश बोऱ्हाडे,अनिल गोडसे, योगेश शिरसे,एकनाथ झांबरे,एकनाथ मामा चव्हाण,भूषण जेजुरकर,कुणाल पवार,प्रशांत आव्हाड,सतीश भदाने, रोहित कडू,प्रकाश चव्हाण,आकाश पवार,सचिन दाभाडे,दुशिंग मॅडम, अक्षय देवकर,राहुल पाटील,नामदेव सोलंके,महेश पवार मुक्तार पठाण सागर दळवी वैभव पगारे विशाल सोळशे आधी सर्वांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *