कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- निसर्गाने अन्याय केल्यामुळे किंवा अपघाताने अपंगत्व नशिबी आलेल्या प्रत्येक दिव्यांग बंधू भगिनीला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करून त्यांच्या जीवनाची वाट सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ यांच्या सौजन्याने व फेलोशीप ऑफ द फिकीकल हॅन्डीकॅप्ड यांच्या सहकार्यातून दिव्यांग बंधू-भगिनींना आवश्यक असणाऱ्या मोफत वस्तू वाटप नाव नोंदणीचा शुभारंभ नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, जगात अशा अनेक व्यक्ति आहेत त्यांच्या शरीरात व्यंग असतांनाही त्यांनी संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशी कामगिरी केली आहे. दिव्यांग बंधुभगिनिंनी देखील स्वावलंबी होऊन मनात न्यूनगंड बाळगता तुमचा भाऊ समजून येणाऱ्या अडचणी सांगाव्या त्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगाना शासनाकडून दिले जाणारे वैश्विक कार्ड व अधिकृत अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठी अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मोफत वाहन व्यवस्था केली आहे. त्या माध्यमातून नुकतेच ११५ दिव्यांग बंधू-भगिनींनी नगर येथे जावून अधिकृत अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून प्रमाणपत्र मिळताच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार आहे.त्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बंधू-भगिनींनी आपली नाव नोंदणी करावी व अंत्योदय शिधापत्रिकेसाठी लागणारे कागदपत्र जमा करावे असे आवाहन केले. असंख्य दिव्यांग बांधवांच्या मागणीनुसार त्यांच्या हक्काच सभागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध होताच निधी देणारच अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
यावेळी फेलोशिप ऑफ फिजिकल हॅन्डीकॅप्डचे मानद सचिव विलास कोलगावकर, जनरल मॅनेजर अत्रीनंदन ढोरमारे, सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, जि. प. सदस्य सुधाकरराव दंडवते, पं. स. सदस्य मधुकरराव टेके, अनिल कदम, श्रावण आसने, दिलीप दाणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, मनसे दिव्यांग जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, नगरसेवक अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. अजय गर्जे, डॉ. संजय उंबरकर, रमेश गवळी, सलीम पठाण, बाबासाहेब शिंदे, मनोज कडू, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, संतोष दळवी, नारायण लांडगे, बाबासाहेब सोनटक्के, बाळासाहेब रुईकर, अमोल गिरमे, रावसाहेब साठे, जावेदभाई शेख आदी मान्यवरांसह दिव्यांग बंधू-भगिनी हजर होते.

फोटो ओळ – दिव्यांग बंधू-भगिनींना मोफत वस्तू वाटप नावनोंदणी शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलतांना आमदार आशुतोष काळे समवेत मान्यवर.
