धारणगाव विर येथे चैतन्य कानिफनाथ मंदिरात धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न:- गुरुमाऊली फक्कड महाराज सानप…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
निफाड तालुक्यातील धारणगाव विर या ठिकाणी गुरुमाऊली फक्कड महाराज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य कानिफनाथ मंदिरात धर्मनाथ बीज सोहळा कार्यक्रम दि.२ फेब्रुवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी भाविक भक्त दर्शनासाठी उपस्थित होते.चैतन्य कानिफनाथ महाराजाचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.धुप दिप प्रज्वलित करुन पुजापाठ करण्यात आला.

त्यानंतर होम हवन करुन, कीर्तन , भजन संध्याचे कार्यक्रम करुन पुजापाठ संपन्न झाले.

यावेळी महाभंडारा प्रसाद वाटप करण्यात आला.नाशिक, मनमाड, कोपरगाव, येवला ,भागातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते. अंतत्य जागृत असे हे मंदिर असुन अनेक भाविक भक्तांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत.गेल्या २५ वर्षापासुन या ठिकाणी विविध कार्यक्रम गुरुमाऊली फक्कड महाराज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.सुरूवातीला छोटेसे मंदिर होते.आता याच ठिकाणी भव्य मंदिर निर्माण झाले असुन जागृत देवस्थान म्हणुन या ठिकाणाला भाविक भक्त दर्शनाला आवर्जुन येत असतात.धर्म बीज सोहळा कार्यक्रम नाथ संप्रदाय महत्वाचा सण मानला जातो.त्यामुळे धर्म बिज सोहळा कार्यक्रम भाविक भक्त मोठ्या आनंदाने साजरा करतात.

या प्रसंगी मंदिरावर भव्य दिव्य लाईट माळा लावण्यात आल्या होत्या.त्यामुळे मन प्रसंन्न झाले होते.असा हा धर्मनाथ बीज सोहळा धारणगाव विर निफाड येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता.दि २० मार्च २०२२ रोजी मढी येथे भव्य पालखीचे आयोजनही करण्यात आले असुन भाविकांनी या पालखीत सहभागी व्हावे असे आवाहन गुरुमाऊली फक्कड महाराज सानप यांनी केले आहे. रविभाऊ संधान महाराज,महेश फटांगरे महाराज,भाऊसाहेब. आहेर महाराज, सुदाम घुमरे महाराज, संजय घुमरे महाराज यांच्या सह अनेक भक्त भाविक या सोहळ्यास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *