बारा बलुतेदारांच्या व मायक्रो ओबीसी यांच्या मागण्यांसाठी व रोहिणी आयोग लवकर लागू करावा जेणेकरून आर्थिक सामाजिक व राजकीय हिस्सेदारी मिळावी अशा मागणीचे निवेदन जळगाव बाराबलुतेदार संघटनेकडुन मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- ओ.बी.सी नेते श्री कल्याणराव दळे साहेब ह्यांचे आदेशानुसार दि.२५ सप्टेंबर रोजी जळगाव शहरात माननीय नामदार अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ ओबीसी चे राष्ट्रीय नेते जळगाव येथे ओबीसी परिषदेनिमित्त अजिंठा रेस्ट हाऊस येथे आले असता त्या ठिकाणी बारा बलुतेदारांच्या व मायक्रो ओबीसी यांच्या मागण्यांसाठी व रोहिणी आयोग लवकरात लवकर लागू करावा जेणेकरून बारा बलुतेदार व मायक्रो ओबीसींना आर्थिक सामाजिक व राजकीय हिस्सेदारी त्या ठिकाणी मिळावी अशी जोरदार मागणी करण्यात आली ह्या संदर्भात निवेदन देताना बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.किशोरभाऊ सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष श्री.मुकुंदराव मेंटकर,प्रदेश सदस्य श्री.ईश्वर मोरे जिल्हाउपाध्यक्ष सखाराम मोरे,जळगाव शहर अध्यक्ष चंद्रशेखर कापडे,अशोकराव पंडित,विलास भाऊ कुंभार,धनराज भाऊ कुंभार,सुभाष भाऊ कुंभार व तसेच बाराबलूतेदार संघटना जळगाव शहर महिला अध्यक्ष सौ. छायाताई कोरडे, जिल्हाध्यक्ष भारती ताई कुमावत , जिल्हाउपाध्यक्षा सौ.आरती ताई शिंपी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *