
कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील एक वर्षांपासून कोरोना महामारीने जगावर सावट असून त्यामुळे सर्वच धार्मिक उत्साहाना काहीशी बंधने आलेली आहेत
पूर्वी गणेशोत्सव म्हटले की दहा दिवस धामधूम असायची या दहा दिवसांच्या काळात पोलिसांवर मोठा ताण पडायचा कुठेही कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना दिवसरात्र पोलीसांचा बंदोबस्त असायचा
या कालावधीत नाक्यांनाक्यावर पावसाची तमा न बाळगता गर्दीत महिला भगिनींची टवाळखोर पोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून पोलीस डोळ्यात तेल घालून तैनात असायचे मग गणपती च्या आरास पाहण्यासाठी होणारी गर्दी असो की गणेश विसर्जन मिरवणूक दहा दिवस अगदी जागता पहारा … या दहा दिवसांच्या कालावधी ना वेळेवर दोन वेळचे जेवण ना पिण्यास चांगले पाणी बंदोबस्त काळात मध्यरात्री पर्यंत सुरू असणारी ‘ढोल पथकाची प्रॅक्टिस’ त्या मुळे ना वेळेवर झोप … पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच त्यातून अपचन ऍसिडिटी डोके दुःखी अशा किरकोळ तक्रारी मात्र सर्व सामान्य जनते साठी एक दिवस जरी आपला दिनक्रम बदलला तरी दुसऱ्या दिवशी चिडचिड होते मात्र आमच्या पोलिसांची कोणतीही तक्रार नाही
दहा दिवस सर्व सामान्य नागरिक आपला आनंद साजरा करत असताना पोलीसातील माणूस व त्याचे कुटुंब यांची काहीशी उलघाल होते मात्र तरी देखील चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसू न देता आपले कर्तव्य पार पडले जाते
शेवटचा दिवस अगदीच कसोटीचा असायचा विसर्जन मिरवणुकी साठी लांबच लांब रांगा ‘ढोल ताशा व डीजे चा आवाज त्या तालावर बेभान होऊन तर कधी बेहोष होऊन ताल धरणारे भक्तगण तसेच किरकोळ कारणावरून व नाचताना धक्का बुक्की होऊन उदभवणारी तणाव पूर्ण परिस्थिती आणि या वातावरणात सुध्दा किंचित अश्वस्त न होता एखाद्या तपस्वी ऋषी प्रमाणे आपले कर्तव्य बजवणारे पोलीस … त्यातच कुठे तरी गणपती विसर्जन करत असताना एखादा भक्त खोल पाण्यात बुडत असताना त्याला जीवाची पर्वा न करता धावून जाणारे पोलीस… अशीच काहीशी परिस्थिती मात्र दहा दिवसाचा उत्सव संपला मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर सुटकेचा स्वास सोडणारे पोलीस ….
मात्र करोना काळात दोन गणेशोत्सव अगदी शांततेत पार पडले गणपती बाप्पा तू सुख कर्ता तूच दुःख हर्ता लवकरच करोना चे संकट जावो ही तुझ्या चरणी प्रार्थना आणि हो सर्व सामान्य नागरिकाना तुझ्या मुळे सण उत्सव साजरे करण्याची जी शिस्त लागली ती अशीच शांततेने व आनंदाने साजरी करण्याची सुबुद्धी दे व या गजबजाटा पोलिसांना शांततेने व आनंददायी बंदोबस्त करण्याची संधी दे हीच प्रार्थना
अँड.नितीन पोळ
लोक स्वराज्य आंदोलन
9860733420
9175894420
