दिव्यांग निधीचे त्वरित वाटप करावे:- श्री मुकुंद मामा काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
दिव्यांगाना 5% शेष निधी उपलब्ध करुन त्वरित वाटप करण्यात यावा तसेच मागील वर्षाप्रमाणे शासनाचे आदेशन्वे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या परिसरातील दिव्यांगांची आकडेवारी नुसार स्थानिक शेष फंडातील 5% रक्कम वितरीत करावी. असे निवेदन संवत्सर ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री कृष्णदास आहीरे साहेब यांना दिले आहे.श्री मुकुंद काळे यांनी दिव्यांगाना संबोधित करून तुम्ही आपला अधिकार प्राप्त करा असे सांगितले.तसेच अधिकारी व्यक्तींना संबोधित करताना ते म्हणाले की,
सध्याच्या या कोरोनाच्या महामारीच्या संकटात सगळ्याचीच अतोनात हाल होत आहे तरी काम करण्याची तयारी असली तरी दिव्यांगाना रोजदारीसाठी बाहेर गावी जाणे शक्य नाही, हाताला काम नाही यामुळे असंख्य दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी शासनाचे परिपत्रिकानुसार 40% चे पुढील ऑफलाईन व ऑनलाइन दिव्यांगांना 5% निधी त्वरीत वाटप करण्यात यावा जेणे करुन दिव्यांगांच्या यातना कमी होतील. दिव्यांग हे स्वाभिमानी आहे परंतू त्यांच्या हक्काचे त्यांना मिळालेच पाहिजे जेणेकरून काही प्रमाणात तरी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल.अधिकारी व्यक्तींनी आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही राबवून संबंधीत दिव्यांगांना 5% निधी त्वरीत वाटप करण्यात यावा. दिव्यांग कायदा अधिनियम 2016 मधील भाग 25 (1) (C) नूसार महाराष्टातील सर्व दिव्यांग बंधू -भगिनीना कोविड लस,कोविड चाचणी व कोविड उपचार ही सर्व शासकीय रुग्णालयातुन प्राधान्यक्रमाने मिळावे.यासाठी भारत सरकारने सर्व आरोग्य विभागास सुचित केले आहे.त्या संदर्भातील अधिकृत आदेश दि.26 एप्रिल 2021 रोजी पारित केला आहे.त्यामुळे दिव्यांग व्यक्तिना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. कोपरगाव मधील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिव्यांगाची यादी तयार करुन ती यादी आप आपल्या ग्रामीण रुग्णालयात देऊन सर्व दिव्यागांना रुग्णालयात बोलुन ऐकाच वेळी लस द्यावी तसेच त्याची येण्या जाण्याची व्यवस्था करावी म्हणजे त्यांना येण्याजान्याची फरफट होणार नाही .सदर प्रसंगी संवत्सर ग्रामपंचायत सदस्य श्री.महेश परजणे देखील उपस्थित होते त्यांनी गावातील सर्व नागरिकांना आव्हान केले की,कृपया सामाजिक अंतर ठेवा,मास्कचा वापर करा,सॅनिटाझर चा वापर करा,बाहेरून आल्यानंतर हात व पाय स्वच्छ धुवा,आपली व कुटुंबाची काळजी घ्या,प्रशासनाला सहकार्य करा.

निवेदनात भारतीय जनता पार्टी सचिव श्री जयवंत मरसाळे,उपाध्यक्ष श्री.संदीप शहाणे शहराध्यक्ष स्वप्निल कडु आदीच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *