रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून गुणवत्तेची काळजी घ्यावी:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात विविध विकासकामे देण्यात आली आहे. मात्र अनेक ठेकेदारांकडून हि विकासकामे वेळेत पूर्ण होत नाही.त्यामुळे ज्या ठेकेदारांनी पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे घेतली आहेत. ती विकासकामे वेळेत गुणवत्तेची काळजी घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी ठेकेदारांना दिल्या आहे.
पंचायत समिती कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांनी ठेकेदारांची बैठक घेऊन विकासकामांच्या बाबतीत सर्व ठेकेदारांना सूचना दिल्या. यावेळी सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, पं.स.सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, कारभारी आगवन, राहुल रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, रोहिदास होन, राहुल जगधने, दिलीप दाणे, प्रशांत वाबळे, सांडूभाई शेख, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,उपभियांता उत्तमराव पवार, सर्व शाखा अभियंता तसेच ठेकेदार उपस्थित होते. यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकासकामे संबंधित ठेकेदारांना दिले आहेत. ती कामे सबंधित ठेकेदारांनी गुणवत्तापूर्ण करून मुदतीच्या आत हि विकासकामे पूर्ण होतील याची काळजी सर्व ठेकेदारांनी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

फोटो ओळ:- पंचायत समिती ठेकेदारांची बैठकीत सूचना करतांना आमदार आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *