कोरोना मुळे मुलांचे मानसिक स्वास्थ बिघडले:- डॉ.उज्वला शिरसाठ- ढाकणे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहून संसर्ग बधितांवर शास्त्रीय उपचार करून कोरोनाला हरवू असे आवाहन बालरोगतज्ञ डॉ. उज्वला शिरसाठ ढाकणे यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर उज्वला शिरसाठ ढाकणे यांचे वतीने लहान मुलांमध्ये होणारा कोरोनासंसर्ग व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय* याविषयी शालेय पातळीवर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्या पुढे म्हणाल्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत त्यामुळे लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून शालेय पातळीवर त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे त्या प्रयत्नातुन या लहान मुलांचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर परत आणता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी चलचित्रफीतीचा वापर करून विद्यार्थ्यांना त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
प्रारंभी राष्ट्रीय हिंदि दिवस निमित्तानं मुन्सी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पुजन डाॕ.उज्वला शिरसाठ-ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री,एस.डी.गोरे तर आभार विदयालयांचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी मानले.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरेआदीनी राष्ट्रीय हिंदी दिवसांच्या शिक्षकांना शुभेच्छा दील्या.
या आॕन लाईन चर्चासत्राला डी.व्ही तुपसैंदर,ई.एल.जाधव,ए.के.काले, ए.बी.अमृतकर, एन.के.बडजाते,एस.एन.शिरसाळे,ए.जे.कोताडे,आदि शिक्षक-शिक्षिका,विदयार्थी-पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *