
कोपरगाव प्रतिनीधी:-
घशातील श्राव तपासणीचे रिपोर्ट तात्काळ मिळणेसाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांना ई मेल द्वारे केली आहे.
ई मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात ढुस यांनी म्हंटले आहे की,
जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर यांचे अंतर्गत जिल्ह्यातील तालूका स्तरावर सुरू असलेल्या कोविड१९ रुग्ण तपासणी साठी जे घशातील श्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवले जातात त्याचे रिपोर्ट संबंधित रुग्णास जवळपास पाच दिवस पर्यंत मिळत नाही. रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह याची पाच दिवस माहिती मिळेपर्यंत संभावित रुग्ण स्वतःच्या कुटुंबात, तसेच बाहेर मुक्तपने फिरत असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असावी.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील श्राव नमुन्याचा रिपोर्ट तात्काळ मिळण्याची व्यवस्था करता आली तर त्या संभाव्य कोरोना रुग्णाला विलाज घेणेसाठी तात्काळ निर्णय घेता येईल, व सदर रुग्ण लगेच रुग्णालयात भरती झाल्याने कोरोना रुग्ण वाढीचा पुढील संभाव्य धोका टळेल तसेच तो रुग्णही लवकर उपचार सुरू झालेने त्यास जीवदान मिळू शकेल.
तरी कृपया घशातील श्राव तपासणीचे रिपोर्ट संबंधितांना तात्काळ मिळणेसाठी आपले स्तरावरून योग्य ती उपाय योजना करावी अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
