कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहर विकासाअंतर्गत विविध कामांना भाजपा शिवसेना गटनेत्यासह सर्व नगरसेवकांनी मंजु-या दिलेल्या आहेत मात्र त्याची कामे अद्यापही सुरू झालेली नाही त्यामुळे शहरवासियांना अडचणी येत आहे तेंव्हा बांधकाम विभागाशी निगडीत असलेल्या विशेष रस्ता अनुदान, चौदावा वित्त आयोग, नगरपालिका फंड या निधीअंतर्गत रस्ते व अन्य विकास कामांना तात्काळ सुरूवात करावी या आशयाचे निवेदन भाजपा गटनेते रविंद्र पाठक, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी व सर्व नगरसेवकांनी सोमवारी नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले.
या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, पालिका सभागृह व सर्वसाधारण सभेसह अन्य विशेष सभेत भाजपा शिवसेना गटनेत्यासह सर्व नगरसेवकांनी बहुसंख्य विकास कामांना मंजु-या दिलेल्या आहेत, ही कामे अजुनही सुरू झालेली नाही त्याबाबत शहरवासियांनी याकामी आमच्याकडे अनेकेवेळा पाठपुरावा केलेला आहे, ही विकासकामे सुरू व्हावीत म्हणून नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी देखील चर्चा केलेल्या आहेत तेंव्हा जनतेच्या जिव्हाळयाशी निगडीत विशेष रस्ते, चौदाव्या वित्त आयोग व पालिका फंडातील कामांना तात्काळ सुरूवात करून ही कामे दर्जेदार होणेबाबत संबंधीत यंत्रणेस आदेश करावे म्हणून सोमवारी श्री. रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, योगेश बागुल व अन्य नगरसेवकांनी समक्ष भेट घेवुन चर्चा केली आहे.


फोटोओळी:- कोपरगांव
कोपरगांव नगरपालिका बांधकाम विभागाशी निगडीत असलेल्या विशेष रस्ता अनुदान, चौदावा वित्त आयोग, नगरपालिका फंड या निधीअंतर्गत रस्ते व अन्य विकास कामांना तात्काळ सुरूवात करण्यांबाबतचे निवेदन भाजपा गटनेते रविंद्र पाठक, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे व सर्व नगरसेवकांनी सोमवारी नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले.
