
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झालेली होती. निवडून येताच रस्ते विकासाला प्राधान्य देत बहुसंख्य रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला असून अनके रस्त्यांची कामे सुरु असून उर्वरित सर्वच खराब रस्त्यांसाठी देखील निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून विकासाच्या बाबतीत सर्वच गावांना प्राधान्य देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे ३६ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मायगाव देवी चौफुली ते देवराम माळी वस्ती रस्ता, अरुण भाकरे वस्ती ते मांजरे वस्ती शाळा रस्ता व योगेश मांजरे घर ते विश्वास जाधव घर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
धामोरी येथील मायगाव देवी चौफुली ते नासिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होवून या रस्त्याला ठिकठिकाणी अनेक मोठ-मोठे खड्डे पडले होते. या रस्त्याचे तातडीने नुतनीकरण करावे अशी नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. ती मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नव्हती. धामोरी येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या मायगाव देवी चौफुली रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये निधी देवून प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरु झाले आहे. मागील काही वर्षापासून होत असलेल्या त्रासातून मुक्तता होणार असल्यामुळे धामोरीच्या नागरिकांनी या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले आहे.यावेळी धामोरी ग्रामपंचायतचे माजी सदस्य अशोक वाघ यांनी राष्ट्रवादीत कॉंग्रेस प्रवेश केला. यावेळी जी.प. सदस्य सुधाकर दंडवते, पं.स.उपसभापती अर्जुनराव काळे, चन्द्रशेखर कुलकर्णी, नारायणराव मांजरे, माधवराव खिलारी यांनी मनोगत व्यक्त करून एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे सांगत आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखरजी कुलकर्णी, नारायणराव मांजरे, पुंडलीक माळी, भगवान माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवरावजी खिलारी, नारायण भाकरे, कचरू भाकरे, भास्करराव मांजरे, भास्करराव वाघ, राहुल जगधने, संकेत कडवे, शिवाजीराव मांजरे, सुदामराव गाडे, नारायण बारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिलीप गाडे, ग्रामविकास अधिकारी एफ.एम. तडवी, ग्रामस्थ, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


फोटो ओळ – धामोरी येथे ३६ लक्ष निधीतून रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे समवेत मान्यवर.
