चाकोरीत कारभार करून पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था आधारवड बनली:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे संस्थापक मा. खा. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी अनेक सहकारी संस्था स्थापन करून या संस्थांचा कारभार करत असतांना आर्थिक शिस्त जपण्याचा आदर्श दाखवून दिला आहे. त्यांनी दाखविलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवत चाकोरीत कारभार करून पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्था हि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी आधारवड बनली आहे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

         पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने पार पडली याप्रसंगी सभासदांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे होते.

        ते पुढे म्हणाले की, मार्च २०१९ पासून जागतिक आरोग्य संघटनेने (कोविड-१९ कोरोना विषाणू) हा जगभर पसरलेला साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. या महामारीचे संपूर्ण विश्वात थैमान सुरु आहे. त्यामुळे राज्यापुढे देखील आर्थिक संकट ओढवलेले असून त्याचा काहीसा परिणाम संस्थेच्या व्यवहारावर देखील झाला असला तरी पतसंस्थेने आपली आर्थिक शिस्त मोडली नाही. कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह गौतमनगर व परिसरातील छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, ग्रामीण भागातील लोकांची प्रगती होणेसाठी हि संस्था कर्ज पुरवठा करत असून वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. दिनांक ३१/०३/२०२१ अखेर संस्थेच्या २९ कोटी १८ लाख ४९ हजारांच्या ठेवी झालेल्या आहे. आज अखेर संस्थेकडे ३१ कोटी ३६ लाखांच्या ठेवी असून त्यामध्ये झपाट्याने होत असलेली वाढ हे संस्थेवर असलेल्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
               सभेचे प्रास्तविक करतांना चेअरमन राधुजी कोळपे यांनी बँकेची आर्थिक सालातील माहिती दिली. अहवाल सालात संस्थेला ढोबळ एन.पी.ए. १३.४७% असून संस्थेने एन.पी.ए. तरतूद रु.५ कोटी ९२ लाख ४४ हजारांची केलेली आहे. संस्थेने १००% एनपीए तरतूद केलेली आहे. त्यामुळे संस्थेचा एनपीए ० % आहे. संस्थेचा अहवाल सालात रु.६६ लाख ९० हजारांचा नफा झालेला असून संस्थेने कायमस्वरूपी सभासदांना १५ % लाभांश दिलेला आहे व परंपरेप्रमाणे चालूवर्षी देखील १५ % लाभांश देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
        अध्यक्षपदाची सूचना अशोक आहेर यांनी मांडली सदर सूचनेस महेश कोळपे यांनी अनुमोदन दिले. अहवाल वाचन मॅनेजर बाळासाहेब काळे  यांनी केले. यावेळी २०२०-२१ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव व्हा. चेअरमन सोपानराव गुडघे यानी मांडला. सभेचे सूत्रसंचालन सुभाष बढे यांनी केले तर आभार संचालक गोरखनाथ दवंगे यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे सर्व सन्मानीय संचालक मंडळ व सभासद ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

फोटो ओळ:- पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे, समवेत संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे, चेअरमन राधुजी कोळपे, व्हा.चेअरमन सोपानराव गुडघे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *