

कोपरगाव प्रतिनिधी:- डॉ. तुषारजी गलांडे व डॉ. सौ. काजलताई गलांडे यांच्या श्री साईज्योती हॉस्पिटल येथे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक बेसल सोलर मशीनचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकरजी दंडवते, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, नगरसेवक विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, राजेंद्रजी वाकचौरे, अजीजभाई शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, राहुलजी रोहमारे, डॉ. अमोलजी अजमेरे, डॉ. आतिषजी काळे, डॉ.संदिपजी मुरूमकर, डॉ. उंबरकर, डॉ. वाघडकर, वाल्मिकजी लहिरे, आकाशजी डागा आदी उपस्थित होते.
