
कोपरगाव प्रतिनिधी:-
नगर मनमाड रस्त्यावर जुनी गंगा देवी मंदिरा जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरातून साईबाबा कॉर्नर ते जुनी गंगा देवी असा पालखी रस्ता झालेला असून सदर रस्ता मोहिनीराज नगर येथून जुनी गंगा देवी मंदिराजवळ नगर मनमाड रस्त्याला जाऊन मिळतो मात्र या ठिकाणी कोणतेही गतिरोधक नसल्याने शिर्डी करून येणारी वाहने वेगाने येत असतात त्याच प्रमाणे रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे असल्याने समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा मोटार सायकलवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अंदाज येत नाही अशा परिस्थिती या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असतात त्यातच अनेक वाहन चालकांना आपले अवयव गमावण्याची वेळ आलेली आहे मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने आता पर्यंत किमान धोकादायक जागा असा देखील बोर्ड लावलेला नाही अगर वाहने सावकाश चालवा असाही बोर्ड नाही रस्ते बांधणी करताना धोकादायक जागा लक्षात घेऊन असे बोर्ड लावणे आवश्यक असते मात्र अशा प्रकारे कोणतीच काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतलेली दिसत नाही
मागील काही दिवसांपूर्वी पुणतांबा चौफुली येथे कायम होणाऱ्या अपघाताबाबत व त्यात निष्पाप नागरिकांना नाहक जीव गमवावे लागले आहेत मात्र त्या ठिकाणी देखील दिशा दर्शक फलक व स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे
