नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी याही वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण स्वतः न करता इतरांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी याही वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण स्वतः न करता इतरांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला.नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात नगरपरीषदेचे जेष्ठ कर्मचारी श्री.राजेश गाडे यांचे शुभहस्ते तर
स्व.माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयात दोन मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.स्वच्छता सर्वेक्षण मधे उत्कृष्ठ काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,उप मुख्याधिकारी सुनील गोर्डे व सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी, आणि विविध पक्षांचे पदाधिकारी-नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपा- वसंत स्मृती कार्यालय येथे सुप्रसिद्ध कलाकार श्री.किरण परीख यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *