शुभविवाहाच्या इंडस्ट्रीला कोरोनाचा लगाम..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- शुभविवाह एक मोठी इंडस्ट्री आहे यात अनेक कुटुंबे अनेक हातांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत परंतु जागतिक कोरोना महामारी ने सर्वत्र थैमान घातले असताना ब्रेक लागला आहे
शुभविवाह म्हणजे दोन कुटुंबांचे दोन मनांचे मधुर मनोमिलन या आनंदात गणगोत नसेल तर आनंद हरवल्या सारख वाटत शुभविवाह ठरल्यानंतर बस्ता ( कपडे खरेदी) किराणा स्टेशनरी मंगल कार्यालय आचारी वाढपी वाजंत्री छायाचित्रकार पाणी लाईटींग पेंटर हारगुचछ आदि लोकांना रोजगार मिळतो परंतु कोरोनाने सर्वांच्या पोटावर पाय दिला आहे
जर शुभविवाह सुरू असते तर अनेक हातांना रोजगार मिळाला असता दुर्दैवाने अनेक कुटुंबांना आर्थिक विवंचनेत दिवस काढावे लागतात लाईट बिल कर्ज हप्ते दैनंदिन खर्च आदि खर्च भागविण्यासाठी मारामार करावी लागते आहे यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला तर त्याला आधार होणार आहे अशी छायाचित्र कार संघटनेची मागणी आहे लाईट बिलात कर्ज हप्त्यात सवलत मिळावी असे हेमचंद्र भवर ( चंद्रमा चे जेष्ठ संचालक) यांनी मांडले आहे मोबाईल मुळे धंदा मंद झाला होता आणि आता कोरोनाने उपासमारीची वेळ आली आहे लाॅकडाऊनमुळे धंदा बंद आहे शासनाने विचार करून काही वळ( बॅक सरकारी कार्यालयात लागणारे फोटो पुरते) स्टुडिओ ऊघडे ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *