आजारपणातही त्यांनी जागविला विवेक..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना शब्द उच्चारला तरी इकडे पाय लटलट कापायला लागतात. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली की, घरचे सखखे, सगेसोयरे लांब दूर पळून जातात. गल्लीतले, आसपासचे ना बोलते होतात, त्याला एखाद्या रोग्याप्रमाणे वाळीत टाकले जाते, पण संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी कोरोणाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेत मायेचा आधार देत आजारपणातही नावाप्रमाणे विवेक जागवला अशी प्रतिक्रिया पुणतांबा परिसरातील जळगाव येथील ह.भ प.विजय महाराज चौधरी यांनी व्यक्त केली. कोल्हे यांचे कोवीड सेंटर नसते तर गोरगरीब कोरोणiग्रस्तांची फरफट होऊन ते तुमच्या आमच्यात आज दिसले नसते. कोल्हे कुटुंबियांचे जीवनदानाचे सत्कर्म चौधरी प्रमाणेच संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघ कुटुंबीयांच्या लक्षात राहील असेही ते म्हणाले.
ह.भ. प. विजय महाराज चौधरी यांचा अनुभव कथन करताना कंठ दाटून आला होता. ते म्हणाले सत्कर्म करा आम्ही नेहमीच भजन-कीर्तनातून इतरांना सांगत असतो त्याची प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कृती काहीजण करतात. पण कोल्हे कुटुंबीय काही वेगळेच आहे. आमचे बंधू नारायण चौधरी कोरोनाने आजारी पडले. त्याची वार्ता कोल्हे कुटुंबापर्यंत गेली आणि त्यांनी संपूर्ण सहकार्य केले. नारायन यास प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन मदत करण्याची मोठी हौस होती. घरची परिस्थिती बेताची होती. आता कसे होणार ही काळजी आमच्या मनात घर करून होती. पण युवानेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोरोना ग्रस्त्त रुग्णIसाठी आत्मा मलिक संकुलात स्वतंत्र कोवीड सेंटर सुरु करून आमच्यासह हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले. त्यांच्या दोन वेळच्या नाश्तासह जेवणाची स्वादिष्ट सोय केली. याशिवाय पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी उपचार घेण्यासाठी वैद्यकीय रुग्णालयांची माहिती, दिमतीला रुग्णवाहिका, स्थानिक कोपरगाव शहरातील वैद्यकीय रुग्णालयात नातेवाईकांसाठी माहिती दालने, प्राणवायूचा पूरेसा साठा, रीमिडीसिवर इंजेक्शन, आयुर्वेदिक औषधी काढे आणि उकडलेली अंडी, रक्त लघवी चाचणीची स्वतंत्र व्यवस्था
करून उपचारासाठी असं सारं काही पुरवलं. रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत सुखरूप घरी आणून सोडलं हे कोल्हे कुटुंबीयांच दातृत्व.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *