प्रशासनाला सहकार्य केले तर कोरोना विरोधातील लढाईत आपल्याला विजय प्राप्त होईल यात शंकाच नाही:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करणारे सर्व शासकिय अधिकारी व कर्मचारी गेली दिड वर्षे कार्यरत आहेत. जनता संचारबंदीत शनिवार व रविवारी सवलत दिलेली असतांना गर्दि गोंधळ होऊ नये, जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन महसुल विभाग, नगरपरिषद, पोलीस विभाग यांना सहकार्य व्हावे यासाठी आज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेसह उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, रविंद्र पाठक, विरेन बोरावके, योगेश बागुल, संदिप वर्पे, मंदार पहाडे, संजय सातभाई, शिलेदार, वाकचौरे, खांडेकर, कालूअप्पा आव्हाड, विनायक गायकवाड इ.उपस्थित होते.
तहसीलदार योगेश चंद्रे साहेब, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब, पोलीस कर्मचारी, कोपरगाव नगरपरिषदेचे सर्वच अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित असल्याने आज रस्त्यावर कुठेही रहदारीचा खोळंबा झाला नाही, बाजार ओट्यावर व्यवस्थित नियोजन झाले. येथून पुढेही सर्वांनी असेच सहकार्य करून नियोजन केल्यास गर्दि -गोंधळ होत नाही हे आज सिद्ध झाले. प्रशासनाला सहकार्य केले तरच कोरोना विरोधातील लढाईत आपल्याला विजय प्राप्त होईल यात शंकाच नाही. विजय वहाडणे नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *