
कोपरगाव प्रतिनिधी:-
लहुजी वस्ताद चौक, सुभाषनगर यांचे वतीने लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाचे सुरुवातीस मान्यवरांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व मान्यवर व लहुभक्त यांचे वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी अर्जुन मारसाळे, नितिन ताकवले, ज्ञानेश्वर घोडेस्वार,विजय मारसाळे, सचिन आहिरे, रंगनाथ मारसाळे, रवी मारसाळे परशुराम ताकवले यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती विनोद राक्षे, नितिन साबळे, सोमनाथ म्हस्के, किरण आढागळे, नितिन पोळ, संदीप निरभवणे, अनिल पगारे, परशुराम साळवे, सुजल चंदनशिव, सागर विसपुते, मयूर रीळ, बुधा भालेराव, लक्षीमन वाल्हेकर, अनिल आवारे इत्यादी मान्यवर उपस्थतीत होते.
