

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.-१ ऑगस्ट २०२१ वार-रविवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो. यांचे संपर्क कार्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच टिळकनगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करुन क्रांतीगुरू सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र या संघटनेच्या नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.


याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले, गटनेते श्री रवींद्रआण्णा पाठक, नगरसेवक श्री जनार्दनजी कदम,जिल्हा सचिव श्री कैलासजी खैरे,अॅड.श्री नितिनजी पोळ, श्री गोपीनाथ गायकवाड,मा.नगराध्यक्ष श्री राजेंद्रजी सोनवणे,शिक्षण मंडळाचे सभापती श्री विनोदजी राक्षे, श्री अशोकराव लकारे,श्री राजेंद्रजी बागुल, श्री सोमनाथजी म्हस्के, श्री रवींद्र पोळ, श्री खालिकभाई कुरेशी, श्री शरदजी त्रिभुवन, श्री फकीरमंहमद पहिलवान, श्री सतिशजी रानोडे, श्री शंकरजी बिर्हाडे, श्री संजयजी तुपसुंदर,श्री बाळासाहेबजी सोळसे,श्री अनिलजी पगारे,श्री संदिपजी निरभवणे, श्री सतिषजी चव्हाण, आर. पी. आय. शहराध्यक्ष श्री देवरामजी पगारे, श्री अशोकराव पगारे, श्री सुजलजी चंदनशिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
