महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा देणारे अण्णाभाऊंचे साहित्य प्रेरणादायी:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा देणारे आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले.

तहसिल कार्यालय कोपरगाव येथे लोकशाहीर तुकाराम भाऊराव तथा अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.तहसिलदार योगेश चंद्रे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.या प्रसंगी तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग,कोतवाल साहेबराव रणशूर यांचेसह तहसिल कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी तहसिलदार चंद्रे पुढे म्हणाले,संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांचे सह अनेकांनी केले आहे.त्यांनी लिहिलेली फकिरा कादंबरी वाचनीय व लोकप्रिय झाली.तसेच त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेले योगदान स्मरणीय असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *