
कु. सिद्धी पंकज लोढा ९६% गुण मिळवुन तालुक्यात प्रथम..! कोपरगाव प्रतिनिधी:- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची कु. सिद्धी पंकज लोढा ९६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच बरोबर विद्यालाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
इ. १२ वी ची दहावी बॅच उत्तीर्णझालीआहे. इयत्ता १२ वी सायन्सची सलग दहावी बॅच असुन यामध्ये प्रथम क्रमांक -सिद्धी पंकज लोढा -९६ % द्वीतीय क्रमांक – श्रेयश संजय बानकर – ९० % तृतीय क्रमांक – खुषी अजित पारख – ८३.०२ % वैश्णवी नंदू पाठक -८३.०२ % इयत्ता १२ वी काॅमर्सची सलग दहावी बॅच असुन यामध्ये प्रथम क्रमांक -आदीती दिपक पवार – ७२.०२ %
यासह २१ विद्यार्थी इयत्ता १२ वी साठी पात्र होते सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. या सर्व गुणवंत विदयाथ्र्याचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका सौ. जे.के.दरेकर, सर्व शिक्षक व सर्व पालकांनी अभिनंदनकेले या सर्व यशस्वी विद्याथ्र्याना विद्यालयाचे शिक्षक जयप्रकाश पांण्डेय, स्वनीलपाटील, बाळासाहेब बढे, रविंद्र कोहकडे, राहुल काशिद, सौ. अनिता वरकड, सौ. निकीता गुजराथी, कैलास कुलकर्णी, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
