कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकरणी बरखास्त निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर लवकरच नवीन कार्यकरणी जाहीर करणार…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :-
लवकरच कोपरगाव नगरपालिकेची निवडणुक होणार असुन शिवसेनेत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे.जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावात कामकाज सुरु आहे.कोपरगाव शहराच्या दुष्ट्यींने कोपरगाव नगरपालिका खुप महत्वाची आहे.कोपरगाव शहराच्या विकासासाठी शिवसेनेची महत्वपुर्ण भुमीका आहे.त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पदाधिकारी यांची फेरबदल करणे गरजेचे आहे.जेणे करुन महत्वाची जबाबदारी कार्यकर्त्यांना देता येईल.यासाठी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कार्यकरणी तसेच विभाग प्रमुख अशी सर्व स्तरावरील कार्यकरणी बरखास्त करण्यात येत आहे.अशी माहिती शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी दिली आहे.लवकरच विचार विनिमय करुन नविन कार्यकरणी जाहिर करु असे ते म्हणाले आहे.तरुणांना यामध्ये संधी दिली जाणार आहे.प्रामाणिक कार्यकर्त्यांनाही जबाबदारी दिली जाणार आहे.त्याच बरोबर राजकारणात काम करु इच्छीणार्या नवतरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *