सलाम या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेबांना:- निलेश काकडे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील
मोहनीराज नगर भागात दोन दिवसांपुर्वी एकच विषयाने खळबळ झाली होती
ईश्वरी दाहा फुट पाईलच्या खड्ड्यात पडली
आणि ही बातमी संपूर्ण गाव गावा पर्यंत पोहोचली
त्याच बरोबर ही बातमी कोपरगाव शहर पोलीस
निरीक्षक माननीय
श्री वासुदेवजी देसले साहेब
यांच्या काना पर्यंत पोचताच आज पर्यंत कधीच वेळेवर न पोहोचणारे पोलीस यावेळी क्षणाचाही विलंब न करता फक्त पंधरा ते वीस मिनिटात साहेब व त्यांची सर्व टीम वेळेवर पोचली
बघता बघता तोबा गर्दी झाली
गर्दीला संभाळणे नागरिकांना शक्य होत नव्हते तर गर्दीमुळे खड्ड्यात पडलेल्या ईश्वरी ला ऑक्सिजन मिळणे देखील शक्य होत नव्हते
यावेळी
एकाअधिकाऱ्यां बरोबरच एक कुटुंब प्रमुख कसा असतो याचे दर्शन प्रत्येक नागरिकांना झाले
त्यांनी प्रथम नागरिकांना विनंती करून दूर करण्याचा 100% प्रयत्न केला
त्याचं बरोबर अग्निशमन दलाचे व स्थानिक नागरिक जेसीबीच्या सहाय्याने केलेल्या सामायिक खाड्यात उतरून काम करत असताना खड्डा कसा घेणे खड्ड्यात पडलेल्या ईश्वरीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देणे परत नागरिकांना खाकीचा दणका देणे
पुन्हा खड्ड्यातील व्यक्तींना मार्गदर्शन करणे याच बरोबर रुग्णवाहिका बोलावून त्या ईश्वरी पर्यंत ऑक्सिजनची नळीतून ऑक्सिजन पुरवणे


आपण
एक अधिकारी नसून जेणे करून आपल्या घरातील एक व्यक्तीच असल्याप्रमाणे धावपळ करणारा अधिकाऱ्याला प्रत्येक व्यक्ती त्याच बरोबर आमचा वासुदेव जोशी समाजातील प्रत्येक नागरिक बघत होता
वाईट प्रसंग असल्याकारणाने आमचे निराश झालेले मनाची हिम्मत वाढवण्याचे काम देखील साहेब करत होते
अपार प्रयत्ना नंतर दीड ते दोन तासानंतर ईश्वरी ला ज्या वेळेस खड्ड्यातून काढण्यात आले त्या वेळी प्रत्येकाने समाधान व्यक्त केले व सगळे अधिकारी निघून गेले
परंतु
ईश्वरी ला खड्ड्यातून बाहेर काढल्या बरोबर साहेबांनी ईश्वरी ला आपल्या हृदयाशी धरून रुग्णवाहिके मध्ये ठेवून स्वतःच्या पोलीस गाडी मध्ये न बसता रुग्णवाहिका मध्ये दोन्ही गुडघ्यावर बसून रुग्णवाहिकेच्या वेगामुळे व रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे ईश्वरी खाली पडू नये याची काळजी साहेब घेत होते
यावेळी
स्वतहाच्या रुमालाने ईश्वराच्या तोंडावरील डोळ्यावरील माती काढणारा अधिकारी
मी बापु काकडे तसेच ईश्वरचरणी चे काका अरुण गंगावणे व मामा विजय सुपेकर आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले
खरंच एवढी काळजी करणारा अधिकाऱ्याला बघितल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही
एवढेच नाही तर मुलीला म्हणाले
बाळा बघ बाबा आहे
आणि
खरच ईश्वरी ने त्या ईश्वर रुपी बाबा कडे बघत डोळे उघडून बघितले व स्मितहास्य केले
आणि या
चिमुकलीला दिर्घ आयुष्य लागणार असे संकेतच परमेश्वराने दिली
एवढे होत असताना त्यांनी हॉस्पिटल ला फोन करून संपूर्ण स्टाप तयार केला

स्वतः तेथे उभे राहून काय उपचार करतात याकडे लक्ष देऊन बघत होते
त्याचबरोबर
हॉस्पिटल बाहेर झालेल्या गर्दीला देखील समजावून सांगत होते
अतिशय भयभीत झालेल्या ईश्वरी च्या आजीला आईला वडिलांना तिच्या संपूर्ण कुटुंबियांना सख्या भावाप्रमाणे एका वडिलांप्रमाणे आधार देण्याचे काम आमचे अधिकारी वासुदेवजी देसले साहेब करत होते
पुन्हा ईश्वर इकडे येऊन बघत होते
प्रत्येक क्षणाला साहेबांचा फोन वाजत होता परंतु साहेबांनी फोन देखील उचलला नाही त्यांचे फक्त लक्ष ईश्वर इकडे होते
ज्या वेळेस
ईश्वरी वर विलाज करून आय सी यु मध्ये नेण्यात आले योग्य ते उपचार झाल्याची खात्री झाली त्यावेळेस साहेबांनी जाण्याची तयारी दाखवली
शेवटी जाताना देखील पुन्हा आमची हिम्मत वाढवत काही जरी अडचण आल्यास मला त्वरित फोन करा मी लगेच येईल असे सांगितले
आज पर्यंत आम्ही खूप अधिकारी बघितले पण अशा कर्तव्यदक्ष अधिकारी मी पहिल्यांदाच बघितला
ईश्वरी ला खऱ्या अर्थाने जीवदान देणाऱ्या देवदुताला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माननीय श्री वासुदेव देसले साहेबांना मनापासून मनापर्यंत मनःपूर्वक
सलाम सलाम सलाम
आपला
निलेश ( बापु ) काकड
संस्थापक
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
सचिव
गिताई प्रतिष्ठान कोपरगाव
९२७०६७४७१०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *