
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना महामारीने आठवडे बाजार बंद असल्याने रोजचा भाजी मंडईत भाजीपाला येत असतो मुळ भाजी मंडई गुरुद्वारा रोड बँक रोड परिसरात आहे परंतु गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना तिथे न बसु देता तहसील कार्यालय जवळ (पोस्ट कार्यालयाजवळ) जागा दिली आहे दुर्दैवाने काही व्यापारी सुद्धा येथे दुकान लावतात शनिवार रविवार बंद वापरानंतर सोमवारी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते काही महिन्यांपूर्वी मोजक्या प्रमाणात असणारे हे भाजी मंडई चे स्वरूप ईतके विशाल झाले आहे की मोकळे मैदान सोडून रस्त्यावर दुतर्फा दुकाने लावली जातात
आणि सोमवार दि २६/७ रोजी कहर म्हणजे शौचालय दारात भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध होता परीसरात दुर्गंधी असुनही मोठ्या प्रमाणात गर्दी होती असे चालले तर आरोग्य कसे सुरक्षित राहणार? शासन प्रशासन विभागाचे लक्ष नाही का? शहराच्या आरोग्यासाठी कोण काळजी घेणार? शौचालय लगत बसलेल्या विक्रेते यांना कोण लगाम लावणार? आज कोरोना महामारी संपलेली नाही रूग्ण प्रमाण कमी जास्त होते आहे शहराला नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्दी कमी करण्यासाठी पुन्हा एकदा पावले ऊचलणे गरजेचे आहे
आणि सर्वात महत्त्वाचे प्रत्येक माणसाने आपल्या परीवाराची स्वतः ची घराची गावाची सुरक्षा राखण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करणे आवश्यक आहे अन्यथा पैश्यापरी पैसा जातो आणि जवळचा माणूस डोळ्यासमोर मरताना बघायची वेळ येते दुःख टाळण्यासाठी गर्दी टाळा
स्वच्छता राखा मुखपटटी वापरा सोशल डिसटंस राखा
शासन प्रशासनाने दिलेल्या सुचना पाळा शासनाला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करायला शिका..!!
