
कोपरगाव प्रतिनिधी:-
तोंडावरचा मास्क काढला आणि खिशात ठेवला , आता कसं,.. मोकळा श्वास घेता आला , दुर्गंधी येतच होती पण त्या मास्कचा कंटाळा आला होता,..नाक चपटं करून घेण्यापेक्षा दुर्गंधी मिश्रीत श्वास घेवू असं ठरवलं आणि दोन मिनीटे डोळे मिटवले ,…काही क्षणातचं कोरोना-लाॅकडाऊनचा काळ चार्ली-चॅपलीन सारखा भरभर मिटलेल्या डोळ्याच्या पडद्याहून सरकत गेला,ह्रदयाचे ठोके वाढायच्या आत मी डोळे उघडले आणि बघतो तर काय,…………….जब्रेश्वराच्या मागे वहाडणे घाटावर बहुतेक कोपरगांवकर म्हणजे त्यात ,..नवीन जोडपे,तरूण मित्र मैत्रिणी,लहान मुलं,आजोबा आजी ..मस्त गोदातीरी संध्याकाळच्या सुर्यास्तच्या सोनेरी किरणांची गोदामाईच्या पवित्र तिर्थसमान पाण्यावर पांघरून घालून आता अंधार होणार म्हणून झोपी लावते आहे,आणि पाखरांचा किलबिलाट म्हणजे गोदेसाठी अंगाई असा भास होऊ लागला होता …फुग्यावाला,चन्यावाला,…..कुल्फीवाला,…बुढ्ढी के बाल वाला,…अगदी कसं एकदम भारी वाटत होतं…..मारूती रायाचं दर्शन घेतलं,समोर स्वामींनाही हात जोडले,शनिमंदिरा समोरून जाताना व्यायामशाळेत पैलवान आखाड्याच्या लाल मातीत मेहनत घेत होते,देवीच्या बाहेरूनच पाया पडलो,…गारीगारचा कारखाना जो-यात सुरू होता,जुने गणपती मंदिराचेही बाप्पांचे दर्शन घडले..,चौकातुन खाली निघालो,सिंकदरभाईंच्या बेकरीवर भलती गर्दी होती,गणेश विखेंच्या प्रसिध्द चहागाडीवर चहा पिणा-यांची मरणाची गर्दी होती,हलवाईच्या मुगवड्याचा सा-या चौकात खमंग वास सुटला होता,…छत्रपतींच्या स्मारकाजवळ येताच मान झुकली आणि नियमीतची अजानही सुरू झाली,..ब-याच दिवसांनी अजानही कानावर पडली,…,छत्रपती शिवरायांना समोर येवून मुजरा करत असताना मोठं घड्याळ पालीकेची हि जुनी ईमारत आहे याची साक्ष देत शहराला वेळेचं भान देत होतं,…विजय कासलीवालचा आवाज “आलो मी आलो” कानावर पडला,…लग्नाच्या वरातीत नवरदेव समोर मित्र कंपनी ‘ गाणं परत वाजवं ‘ म्हणून हट्ट धरत होती पण त्यामुळं ट्राफीक जाम झाली होती,हवालदार शिट्ट्या मारीत गर्दी पांगवत होते,….काॅंग्रेस सेवादल समोर गणपती डेकोरेशनची तयारी सुरूच होती,…डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बीजेपीच्या उद्याच्या सभेची तयारी सुरू होती…खाली रिक्षा स्टॅंडवर साधना पान टपरीवर पान घेणा-यांची तुडूंब गर्दी होती,…समोर शिवसेनेच्या एस टी डी वर गरजूंना न्याय देण्याचं काम शिवसैनिकांच्या माध्यमातून देताना दिसत होतं….,…उसाच्या भरलेल्या ट्रकातून कारटे ऊस ओढताना दिसत होते…बस स्थानकाचा एस टी कुठल्या प्लेटफाॅर्म लागली याची खात्री प्रवाशांना देत होती त्याचा विचीत्र आवाज पण मजेशीर कानावर आदळत होता,….आणि साडे आठ चा भोंगा वाजला तरीही स्टॅंडवर वर्दळ जबरदस्तच होती,…..,,सगळं काही अलबेल दिसत होतं….,ऊर कसं भरून आलं होतं,…काळीज थपतपत होतं,…कसं आपल्या गावांत सर्व धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात,….अश्रू घरंगळत मिशीत घुसले आणि मी ते पुसण्यासाठी हात वर केला तर मास्क तोंडावरच होते,…अरे म्हणजे मी उघड्या डोळ्यानं स्वप्न पाहत होतं तर,….
…..,पुन्हा कधी ते दिवस येतील जे तेंव्हासारखे गजबजलेले कोपरगांव शहर उघड्या डोळ्याने पाहू शकेल ,स्वप्नात नाही ,..तर जीवंतपणे अगदी सत्त्यात….
असो,..
काळजी घ्या सर्वांनी,सकारात्मक उर्जा देणारं वातावरणं निर्माण करा,वाचन संस्कृती पुर्नजीवीत करा,मैदानाकडे पुन्हा झेप घ्या,ईतर आदर्श घेतील असंच वागा,शिक्षण आणि आरोग्याकडे जास्त वेळ द्या,आपल्या आसपास कचरा होवू देवू नका,झाडे लावा-पाणी जिरवा….मंग कोरोनाच काय ,..शंभर नाही तर अब्जो कौरवही एकत्र आले ना तरी तुम्ही सहज त्यांना पिटाळून लावत,..सुखरूप जगु शकाल…,
भरत मोरे..
९५५२२२५५२८
.
सदरील लेख १३/०२/२०२१ चा एक वर्ष जुना आहे…
