ग्राम विकासात युवकांनी योगदान द्यावे:- प्रकाश मनुरे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हा युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाश मनुरे होते.
प्रकाश मनुरे म्हणाले की ग्रामीण युवकांना नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून नियमीत वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करून प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून दिल्या जात असतात. तसेच विधायक कार्यासाठी मदतही केली जाते. यामध्ये क्रीडा साहित्यच वाटप असेल, प्रोत्साहन पुरस्कार असतील, स्वच्छता सुविधांसाठी इतर कार्यक्रम असेल तर त्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे युवकांनी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आव्हान मनोर यांनी केले.
प्रसंगी युवकांना मोहम्मद अरिफ खान यांनी सशक्त भारत या विषयावर तर, मंदार वैद्य यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. तसेच नेल्सन मंडेला पुरस्कारप्राप्त डॉक्टर मोहन शेलार यांनी पाणी वापर व पाणी व्यवस्थापन या अनुषंगाने मार्गदर्शन करत युवकांना पाणी बचती बद्दल आवाहन केले.
यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्हाभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा मंडळास जिल्हा स्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वच्छ भारत अभियानात कार्य करणाऱ्या तीन युवा राष्ट्रीय स्वयंसेवकांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये प्रथम पुरस्कार धम्मश्री अहिर, द्वितीय पुरस्कार किरण चव्हाण व तृतीय पुरस्कार रूपाली वाघेरे यांना देऊन गौरव करण्यात आला. तसेच युवा मंडळांना प्रोत्साहन म्हणून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या 30 युवा मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटपही कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश मनुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
2019-20 मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे युवा मंडळ म्हणून बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था सोमठाणे, सिन्नर तर 2021-22 मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे युवा मंडळ म्हणून सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्था पाटोदा. तालुका येवला चा गौरव करण्यात आला.
प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, लेखाधिकारी सुनील पंजे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप आहेर तसेच नेहरू युवा केंद्राच्या युवा राष्ट्रीय स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी:-
मोहम्मद आरीफ खान,राज्य संचालक श्री प्रकाश कुमार मनुरे, राज्यस्तर प्रथम विजेती अक्षता देशपांडे, आई मानसी देशपांडे, वडील माधव देशपांडे, डॉ. मोहन शेलार व जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *