भारतीय जनता पार्टी जिल्हा कामगार आघाडीचे नुतन पदाधिकारी निवड जाहिर..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व उत्तर नगर जिल्ह्याचे कामगार आघाडीचे संयोजक सतिष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्हा नुतन कामगार आघाडी मोर्चाची पदाधिकारी यांची निवड करुन पुढील पक्ष वाढीसाठी पदाधिकारी यांना भावी वाटचालीस भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच भारतीय जनता पार्टी पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी प्रचार व प्रसार करत पक्षाची ध्येयधोरण तळागाळातील नागरीकांना पर्यंत पोहचविणे महत्वाचे असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या. उत्तर नगर जिल्हाची कामगार आघाडी पुढील प्रमाणे
उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष श्री.विनायक कोंडाजी थोरात (घुलेवाडी संगमनेर), श्री.नंदकुमार मार्तंडराव नागरगोजे (साकुरी,राहाता), श्री.रविंद्र बंडु आजगे (लोणारी गल्ली,श्रीरामपुर), श्री.राजेंद्र माधव लहानगे (राजुर,अकोले), श्री.दिलीप तिकांडे (टाकळी,अकोले) उत्तरनगर जिल्हा सरचिटणीस श्री.अभिषेक संतोष पवार (गणपती मंदिराजवळ,कोपरगाव), उत्तरनगर जिल्हा चिटणीस श्री.मुख्तार बुढन पठाण (साईधाम अंबिकानगर,कोपरगांव , श्री.गोटीराम साहेबराव दाढे (नांदुर्खी रोड,शिर्डी राहाता), उत्तरनगर जिल्हा सचिव श्री.किरण भिमरज कांदळकर (अस्तगाव राहाता),श्री.दत्तात्रय नारायण रत्नपारखी (कुंभेफळ,अकोले), उत्तरनगर जिल्हा सदस्य श्री.सुरेश वसंत चावरे (सुभाषनगर,कोपरगांव), श्री.उत्तम दत्तु नवले (मलदाड,संगमनेर), श्री.श्रीराम दगडु रुंद्रे (गरधनी,अकोले री.विजय सोनाजी पवार (सुभाषनगर,कोपरगांव) यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *