
कोपरगाव प्रतिनिधी:-
केंद्र सरकार पासून ते तालुका प्रशासना पर्यंत प्रशासनाची अनेक कामे करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते. जनगणना, सर्व्हे, बीएलओ, आरोग्य तपासणी अश्या प्रकारची तब्बल शंभरहुन अधिक अशैक्षणिक कामे शिक्षकां मार्फत करून घेतली जातात मात्र सर्वच शिक्षक स्वखुशीने हे कामे करत नाहीत. नाईलाजाने व जबरदस्तीने करवून घेतलेली कामे खरोखरच परिपूर्ण होतात काय? हा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो. मात्र ह्याच प्रकारची कामे करण्यासाठी शासनाला सहाय्य म्हणून राज्यातील पात्र व सुशिक्षित बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात अथवा कंत्राटी पद्धतीने रुजू करून संधी दिल्यास रोजगार देखील मिळेल व शिक्षक संघटनांच्या तक्रारी देखिल कमी होतील. गृहरक्षक दल ज्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस दलाची सहाय्यता म्हणून काम करते त्याच अनुषंगाने प्रशासकीय सहाय्यता म्हणून महसूल व कौशल विकास – रोजगार विभागाच्या माध्यमातून अश्या प्रकारे स्वतंत्र दल निर्माण करता येणे शक्य ज्या मार्फत सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी व गुणवत्ता चाचणी करून प्रशासकीय कामात कंत्राटी पध्दतीने बेरोजगार युवकांना सहभागी करून घेता येईल असेही पोटे यांनी निवेदनात म्हटले आहे. सदरील संकल्पनेचे सादरीकरण तुषार पोटे यांनी बुधवारी मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, कौशल विकास मंत्री ना.नवाब मलिक यांच्या समोर सादर केले व त्यांना सकारात्मक असा प्रतिसाद देखील मिळाला आहे. ह्या कामी आमदार सुनील अण्णा शेळके, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन तुषार पोटे यांना लाभले आहे.
