एक संवेदनशील वाचक सौ.पुष्पाताई अशोक काळे:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई अशोक काळे यांचा ७ जुलै रोजी वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सौ पुष्पाताई काळे यांनी आजतागायत अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आर्थिक संकटाचा सामना करत जीवन जगत असताना परीस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले कुटुंबांना गटांना प्रोत्साहन देत उद्योजक बनवून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग दाखविला आहे अनेक महिलांचे मोडकळीस आलेल्या संसाराचा गाडा सुरळीत चालू ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून अनेकविध प्रकारची माहिती घेऊन कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केला आहे अनेक कुटुंबांना आधार दिला आहे संकटकाळी मदत केली आहे
सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव मदतीला धावून जाण्याची तयारी असलेले हे व्यक्तिमत्त्व आणखी एक गुणांनी युक्त आहे ते म्हणजे वाचन सौ पुष्पाताई काळे यांना वाचनाची भारी आवड आहे कुठेही गेल्या आणि ग्रंथ दिसले तर त्या घेणारच आणि इत्यंभूत वाचणार वाचणाने माणसाची ज्ञानाची भूक भागते वाचनाने अनुभवांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत सौ पुष्पाताई काळे हे संवेदनशील मन सतत काही ना काहीतरी वाचत असते म्हणून त्यांनी सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव समाजजागृती साठी प्रयत्न केले आहे वाचनाने समाजातील सुखदुःखाची अनुभुती घेत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि मग मदतीचा हात पुढे केला जातो
अशा सेवाभावी वृत्तीने सदैव मदतीला धावून जाण्याची तयारी असलेले हे व्यक्तिमत्त्व
आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
भावि आयुष्य सुखी समाधानी आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *