तुमचे डोके ठिकाणावर आहे का?:- विजय वहाडणे….

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज तर निचपणाचा कळसच गाठला. शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दुत सोबत घेऊन कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन” मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी पत्र दिले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून 144 कलम भंग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी करणाऱ्या कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे डावपेच केले. मान्सूनपूर्व कामे करायला परवानगी असल्याने नगराध्यक्ष म्हणून मी व तालुक्याचे आमदार यांना व स्थानिक नगरसेवकांना कार्यक्रमाला बोलावले. अधिकाऱ्यांनाही बोलावले. निमंत्रण पत्रिका नाही, भाषणे नाहीत. त्याठिकाणी काही स्थानिक रहिवाशीही आले. कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार करावी. विकासकामे करतांना मुख्याधिकारी मला सहकार्य करतात म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी असा पोरकटपणा सुरू आहे. मागील महिन्यात संजीवनी कोविड सेंटरच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावून प्रचंड गर्दि जमवून स्वतःचा उदोउदो करून घेणाऱ्या कोल्हे टोळीविरुद्ध 144 कलम भंगाचा गुन्हा का दाखल होत नाही? सार्वजनिक हिताचे उपक्रम करतांना तरी कुणीही राजकारण करू नये.
मे.जिल्हाधिकारी साहेबांनी 28 विकासकामे मार्गी लावण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर मी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना पत्र दिले कि, आता 28 कामांचा निर्णय झालेला आहे. आतातरी तुमच्या प्रभागातील विकासकामे करायचीत कि नाही, हे लेखी कळवा असे पत्र मी सर्वच नगरसेवकांना दि. 5/4/2021 रोजी दिले. पण माझे पाय ओढण्याच्या नादात कोल्हे गटाच्या अपवाद वगळता कुणीही “आमच्या प्रभागातील कामे सुरू करा” असे पत्र आजपर्यंत दिलेले नाही. राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी ही कामे सुरू करा असे लेखी कळविले. पण कोल्हे गटाचे अनेक नगरसेवक मला येऊन भेटून सांगतात कि, कोल्हे यांच्या आदेशाशिवाय आम्ही असे पत्र देऊ शकत नाही. मंजूर झालेली कामेही होऊ द्यायची नाहीत, त्यामुळे प्रभागातील नागरिकांना असे वाटते कि नगराध्यक्षच कामे होऊ देत नाहीत.
कोल्हे गटाचे व इतरही सर्व नगरसेवक, शहरातील काही पक्ष व संघटना कार्यक्षम मुख्याधिकारी सरोदे यांची बदली होऊ देऊ नका मला भेटून सांगतात. पण कोल्हे यांच्या आदेशावरून काहीजण त्याच अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करतात. सत्ता नाही म्हणून तडफडणाऱ्या कोल्हे गटाने पोरकटपणा बंद करावा. स्वतःच्याच प्रभागातील विकासकामे करायला विरोध करण्याचा मूर्खपणा केल्याचा विक्रम महाराष्ट्रात “कोल्हे” यांच्याच नावावर नोंदवला जाणार आहे. विक्रमवीर-विक्रमादित्य कोल्हे यांचे जाहिर अभिनंदन. या विक्रमाबद्दल त्यांचा सत्कार डॉ.आंबेडकर मैदानावर करायचा आहे, पण गर्दि जमविली तर माझ्यावरही गुन्हा दाखल होईल म्हणून कोरोना पुर्णपणे गेल्यानंतरच असा सत्कार करता येईल. विजय वहाडणे नगराध्‍यक्ष कोपरगांव नगरपरिषद, कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *