
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोविड विषाणू च्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जाहीर केलेल्या आर्थिक साह्य अंतर्गत व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफतअन्नधान्य वितरण करण्याबाबत सेवी संस्थेच्या मदतीने जनजागृती करावी. असे आव्हान करण्यात आले आहे त्या अनुषंगाने कोपरगांव शहर व तालुक्यातील शिवसेनेने “माझे रेशन माझा अधिकार “असा मंच स्थापन करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील(NFSA) अंत्यदोय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याच्या शासनाने निर्णय घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांनी ठरवले आहे . *माझे रेशन माझाअधिकार’ कोपरगाव शहर समिती
*कलविंदर सिंग डड्याळ
*भरत आसाराम मोरे
*असलम गफुर शेख
*इरफान कमरुद्दीन शेख
*गगन हाडा
*प्रफुल्ल शिंगाडे
*बाळासाहेब साळुंखे
*अमजद शेख
*विकास शर्मा
*माझे रेशन माझा अधिकार तालुका ग्रामीण भागातील समिती.
*शिवाजी मुरलीधर ठाकरे
*रावसाहेब भिमाजी थोरात
*श्रीरंग दिनकर चांदगुडे
*बाळासाहेब बबन मापारी
*बाळासाहेब रखमाजी राऊत
*सचिन लक्ष्मण आसणे
*महेश कुलकर्णी
- पंकज शिंदे
या योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना एप्रिल व मे 2021 या दोन महिन्यात पैकी एक महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू दोन किलो तांदूळ तसेच आत्योदय योजने अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्य याचे मोफत वितरण करण्यात येत आहे तसेच या योजनेतील माहे मे 2021 करता अनुज्ञेय असलेले नियमीत अन्य धान्य वितरित प्रति सदस्य प्रतिमहा पाच किलो व त्याच प्रकारे माहे जून 2021मध्ये अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन त्यांचा लाभ घ्यावा व काही अडचण आल्यास माझा माझा अधिकार कोपरगावचे ह्या समितीची या मधील सदस्यांची संपर्क साधावा असा अव्हान करण्यात येत आहे.
