
कोपरगाव प्रतिनिधी:-
बारा बलुतेदार महासंघाच्या जळगांव जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी जळगांव यांना बारा बलुतेदार यांच्या विविध मागण्या सह नाभिक समाजाच्या सलून व्यवसाय त्वरित सुरू होण्यासाठी निवेदन देण्यात आले त्याच प्रसंगी बारा बलुतेदार महा संघाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षा किशोर भाऊ सुर्यवंशी शहर महानगर अध्याक्ष मुकुंद भाऊ मेटकर | महिला जिल्हा अध्यक्षा भारती ताई कुमावत महिला शहराध्यक्षा छाया ताई कोरडे शहर सचिव अलका ताई सोनवणे शहर उपाध्यक्ष आरती शिंपी महानगर उपाध्यक्षा चंदशेखर कापडे अमोल कोल्हे संजय विसपुते सुनील वानखेडे रविंद्र दादा बोरणारे आत्माराम भाऊ महाले इत्यादी बारा बलुतेदार उपस्थिती होते.

दिनांक १/०६/२०२१ रोजीच्या लाॅकडाउन स्थीली करणातील सलुन व्यवसायाचे चित्र स्पष्ट करण्या बाबत.
वरिल विषयी विनंती पुर्वक निवेदन देण्यात आले. आमच्या पक्ष व संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी शिष्ट मंडळाने मा. मुख्यमंत्री साहेबांना वेळो वेळी समक्ष निवेदन देऊन नाभिक समाजाच्या करुणामय व्याथाचे विवेचण मांडले होते. त्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री साहेबांनी सलुन व्यवसाय संदर्भात काय निर्णय दिला त्या विषयी समाज बांधवांत संभ्रांत स्थिति आहे. मे. साहेब आपण आपल्या आधिकारात काही नियम व आटी ठेऊन शहरी व ग्रामीण भागात नाभिक समाज बांधवाना सलुन व्यवसायास परवांनगी द्यावी.
साहेब, सरकारी आदेशा नंतरही आज जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण आहे,
कुठेही स्पष्ट वाच्यता नसल्याने,
शासनाने दिलेल्या वेळेत सलून व्यवसाय सुरू करायचा की नाही यां विवंचनेत आमचे बांधव आहेत,
जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयाकडून सविस्तर माहिती न मिळाल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे,
कृपा करून सदर विषयाबद्दल सविस्तर खुलासा करून सलून व्यवसायासंबंधी सविस्तर माहिती देऊन हॉट स्पॉट वगळता इतरत्र सर्व ठिकाणी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी ही नम्र विनंती
आपला :-
राष्ट्रीय जन सेवा पक्षा व
बारा बलुतेदार महासंघ
जळगांव जिल्हा
