
कोपरगाव प्रतिनिधी:-
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी ३१ मे रोजी कोळपेवाडी येथे त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कुलचे कलाशिक्षक श्री. गोरक्षनाथजी चव्हाण यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त गाणे रचून तसेच रांगोळीच्या माध्यमातून आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले त्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते श्री. गोरक्षनाथ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक व कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभानजी कोळपे, उपसरपंच प्रकाशजी कोळपे, निवृत्तीराव कोळपे, ज्ञानेश्वरजी हाळनोर, पोपटराव जुंधारे, वसंतराव कोळपे, विलासजी कोळपे, अनिलजी कोळपे, विजयजी कोळपे, सूर्यभानजी पुंजाजी कोळपे व ग्रामस्थ उपस्थित होते.
