के.जे. सोमैया महाविद्यालयातील, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.डॉ. सतीश काळे व सौ. अलकनंदा सतीश काळे यांचे चिरंजीव कृष्णा सतीश काळे यांची भारतीय नौसेनेत सबलेफ्टनंट पदी नियुक्ती…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर सारख्या एका छोट्या खेड्यातील चि. कृष्णा सतीश काळे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय नौसेनेमध्ये सबलेफ्टनंट या पदावर सरळ नियुक्ती मिळविली. सदर सबलेफ्टनंट अधिकारीपदी सरळ नियुक्ती झालेले हे तालुक्यातील पहिले अधिकारी ठरले आहे. नुकतेच इझिमाला, केरळ येथे त्यांची पासिंग आऊट परेड संपन्न झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ते कै. भास्करराव माधवराव काळे यांचे नातू व के. जे. सोमैया महाविद्यालयातील, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ. सतीश काळे व सौ. अलकनंदा सतीश काळे यांचे चिरंजीव आहे.
चि. कृष्णा काळे यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण महर्षी विद्या मंदिर कोकमठाण येथून पूर्ण केले व दहावीला असताना त्याने औरंगाबाद येथील सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेची (एस. पी. आय.) परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्ण झाल्याने बारावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण तेथेच झाले. ही परीक्षा देतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.) ची परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन बोर्ड (एस. एस. बी) मार्फत त्यांची रितसर निवड झाली. ते २०१७ मध्ये अखिल भारतीय गुणवत्ता यादीत आल्याने यशस्वी झाले व त्यांना राष्ट्रीय नौदल संरक्षण प्रबोधनी इजिमाला, केरळ येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. सदर प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच त्यांनी पुढील चार वर्षात बी. टेक ही अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केली..
भारतीय नौदलात कोपरगांव व संवत्सर सारख्या खेड्यातील अधिकारी पद प्राप्त करणारी त्यांची वाटचाल पुढील शैक्षणिक पिढ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. आपण ठरविले व जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर आपणही असेच उच्चपदस्थ पदे प्राप्त करून देशसेवा करून, आपल्या कुटुंबालाही अभिमान वाटेल असे काही करू शकतो, हे या निमित्ताने त्यांने सिद्ध आहे.
चि. कृष्णा यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केल्याबद्दल संवत्सर च्या गोदावरी दूध संघाचे चेअरमन मा. श्री. राजेश आबा परजणे, सरपंच मा.श्री. विवेकभाऊ परजणे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे, सचिव. ऍड. संजीव कुलकर्णी व प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व के. जे. सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक इ. सर्वांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *