
कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रीय सेवा योजना,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले,यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव उपप्राचार्य डॉ. एस. आर. पगारे,राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डाॅ.एस.के.बनसोडे विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. दवंगे कार्यालयीन अधिक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, भूगोल विभाग प्रमुख डाॅ. जी.के. चव्हाण,प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

स्वराज्य दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डाॅ. के. एल. गिरमकर यांनी ‘शिवराज्याभिषेक- एक सुवर्ण क्षण’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या विषयी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे.या स्वराज्याची मुठ बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरातून अनेक जाती धर्माचे मावळे एकत्र केले होते.दीन दलित व शेतकरी यांच्या विषयी महाराजांना विशेष आस्था होती.राजांनी आपले आयुष्य रयतेसाठी वेचले.छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचे जानते राजे म्हणतात.’
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. बी. एस. यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.एस.आर.पगारे, महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.व्ही.सी.ठाणगे,विज्ञान शाखा प्रमुख डाॅ.बी.बी.भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.आर. सोनवणे ,राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डाॅ.एस.के. बनसोडे,कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यकम अधिकारी प्रा. डाॅ बी.एस गायकवाड,डाॅ. एस. बी.भिंगारदिवे, डाॅ. एस.एस.नागरे महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी,राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व महाविद्यालयातील इतर विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक डॉ. बी. एस. गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. एस.एस.नागरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक डाॅ. एस.के.बनसोडे, प्राचार्य डॉ. बी एस यादव,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. एस.डी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
