कोपरगाव तालुक्यात प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे कोरोना बधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे:- ओमप्रकाश तथा काका कोयटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या 1 जून पासूनच्या लोकडाऊन निर्देशानुसार , महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली आहे अश्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचे अधिकार मा.जिल्हाधिकारी यांना दिले आहेत .
त्या आधारे ,कोपरगाव तालुक्यात प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे कोरोना बधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे हे आपणांस ज्ञात आहेच.
त्यामुळे आम्ही आपणांस विनंती करतो की , अत्यावश्यक सेवा असलेल्या मात्र गेले
दोन महिने बंद असलेल्या ,
कापड , रेडिमेड , मोबाईल विक्री व दुरुस्ती , चर्मकार , स्टेशनरी , सुवर्ण विक्रेते व कारागीर , झेरॉक्स या सारख्या विविध व्यापारी बांधवाना किराणा व भाजीपाला व्यापाराच्या वेळेतच दुकाने उघडण्यास परवानगी आपण द्यावी .
कारण , किराणा अथवा भाजीपाला , फळे घेण्यासाठी येणारा नागरिक तेव्हढ्याच वेळेत ही सर्व सेवा घेईल .
तरी कृपया गेल्या दोन महिन्यांपासून आपला व्यापार बंद ठेऊन कोरोना नियंत्रणात शासनाला सहकार्य करणाऱ्या या सर्व व्यापारी घटकासाठी आपण आपल्या अधिकारात निर्णय घ्यावा ही कळकळीची नम्र विनंती अशी मागणी ओमप्रकाश तथा काका कोयटे , अध्यक्ष , कोपरगाव ता.व्या.महासंघ , कोपरगाव यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना पत्राद्वारे केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *