

कोपरगाव प्रतिनिधी:-
नगरपालिका शाळा क्रमांक 1 कोपरगाव ह्या शाळेच्या मा. मुख्याध्यापिका बिबवे ताई ह्या वेगवेगळे उपक्रम शाळेत घेत असतात.. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुख्याध्यापिका बिबवे ताई विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात.. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे प्रबोधन करतात. विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन करतात.. मुलांना गाडीवर शाळेत घेऊन येतात.. महामानवाच्या जयंती निमित्ताने इयत्ता पहिली व ईतर वर्गाचे पट नोंदणी केली व त्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. डॉ. बाबासाहेब विषयीची माहिती सांगितली. शिक्षणाचे महत्व सांगितले. त्यावेळेस सौ. मनिषा जगताप, ताई कसबे, श्री. अहिरे उपस्थित होते.. तसेच ऑनलाइन भाषण, रांगोळी, गाणे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकांनी व्हिडिओ, फोटो पाठविले. अशा उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. सौ. ताई कसबे ह्यांनी पण गाणे बाबासाहेब आंबेडकर वर गायले. पालकांनाही मुख्याध्यापकांनी घरी येऊन खाऊ वाटून जयंती साजरी केल्याने त्यांनी मुख्याध्यापिका बिबवे ताईचे आभार मानले.
