यंदाही सार्वजनिक नवरात्र उत्सव नकोच:-विजय वहाडणे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
सलग दोन वर्षे कोपरगाव शहरातील नागरिक,गणेश भक्त,सार्वजनिक गणेश मंडळे व सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वी करून दाखविला.महाराष्ट्रात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी फक्त कोपरगावमधेच हा उपक्रम राबवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा प्रयत्न केला.आताही कोपरगाव नगरपरिषद व आरोग्य विभाग,महसूल विभाग व नागरिकांच्या सहकार्याने लसीकरण मोहिमही मोठ्या प्रमाणांत यशस्वीपणे सुरू आहे.
जरी शासनाने 7 ऑक्टोबरपासून मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली असली तरीही आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करू नये ही नम्र विनंती. गर्दि जमा झाल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठाच धोका आहे. दुर्दैवाने कोरोना प्रादुर्भाव वाढण्यातअहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात एक नंबरवर आहे.2 वर्षात कोपरगावात कोरोनामुळे झालेली प्राणहानी सर्वांनीच अनुभवलेली आहे.
पुन्हा अशी दुरावस्था होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सर्व नियम,कायदे काटेकोरपणे पाळून सर्वांचेच जीवित सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *