शेतकऱ्यांना भाजी पाला विक्री करण्यास परवानगी द्यावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
ऐन उन्हाळ्यात विहिरीला पुरेसे पाणी नसताना जीवापाड जपलेला भाजी पाला विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की फेब्रुवारी मार्च महिन्यात रब्बीची पिके निघाल्यानंतर विहिरीत असलेल्या थोड्या फार पाण्यावर शेतकरी भाजी पाला पिके उभी करतात उन्हाळ्यात लग्न सराईचे दिवस असल्याने वांगे,कोथिंबीर भेंडी, गवार तसेच सर्व पालेभाज्या आदी पिकांना मागणी असते मात्र गेल्या एक ते दीड वर्षांपासून साथीच्या आजारामुळे लॉक वाढत आहे त्यामुळे भाजी पाला पिके घेऊन देखील विक्री करता बाजार पेठ उपलब्ध होत नाही भाजीपाला पिकाचा तोडा दोन तीन दिवसांनी करावा लागतो त्यानंतर पालेभाज्यांचा तोडा केल्यास भाजी पाल्याला भाव मिळत नाही वाढत्या लॉक डाऊन व भाजी पाला विक्रीवर निर्बंध आल्या मुळे शेतकऱ्यांना भाजी पाला विक्रीसाठी वेळेवर मार्केट उपलब्ध होत नाही त्यामुळे महागडी बियाणे, औषधे,खते तसेच वाहतूक खर्च याचा ताळमेळ बसत नाही त्यामुळे जीवापाड जपलेला भाजीपाला शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विक्री करावा लागत आहे तसेच शहरातील अनेक किरकोळ भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून ग्राहकांना विकतात मात्र आठवडी बाजार बंद आहेत तसेच भाजीपाला विक्री करण्याच्या वेळा कमी केल्या आहेत त्यामुळे या विक्रेत्यांचे देखील हाल होत आहे तसेच भाजीपाला विक्रीच्या वेळा ठरवून दिल्यामुळे ते खरेदी करण्यास गर्दी होते व ग्राहकांना देखील भाजीपाला महागड्या भावाने खरेदी करावा लागत आहे
त्यामुळे शेतकरी व भाजीपाला विक्रेते यांनी भाजी पाला विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *